Bidkin News : ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

Chhatrapati Sambhajinagar: पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील चितेगाव परिसर मध्ये ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन...
A tragic suicide case has emerged in Bidkin
A tragic suicide case has emerged in Bidkin Sakal
Updated on

बिडकीन: पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील चितेगाव परिसर मध्ये ३४ वर्षीय तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या सविस्तर माहिती अशी की बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील चितेगाव परिसरातील शेती गट नंबर २०६ मधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने मयत रमेश बबन अंगरख वय ३३ रा. चितेगाव ता. पैठण याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दि. ४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता आढळून आले.

या घटनेची बिडकीन पोलीसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे, साहेबराव राठोड, शिवानंद बनगे, घटनास्थळी जाऊन प्रेताला खाली काढून पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे यांनी मृत घोषित करुन शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

A tragic suicide case has emerged in Bidkin
मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

रमेश बबन अंगरख हा तीन दिवसापासून घरामधून बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना सांगितले, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे पुढील तपास करीत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.