अबब...गाईच्या पोटात दहा किलो प्लास्टीक

loha gay.
loha gay.
Updated on

लोहा : सावरगाव (ता.लोहा) येथील रमाकांत स्वामी या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे  सोडून दिले होते. दरम्यान लोहा येथील पशूचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी (ता.आठ) सावरगाव  येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रिया करत दहा किलो पॉलिथिन काढले. सोबत दोन नाणी, वायसर असे साहित्य  निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रियेतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

 
या वेळी पशूचिकित्सक डॉ. आर.एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियेनंतर गायीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. गाय आजारी असल्याचे समजल्यावर या वेळी जेंव्हा गायीची तपासणी करून डॉक्टरांनी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान या गायीच्या पोटातून त्यांनी तब्बल १० किलो इतक्या वजनाचे प्लॅस्टिक बाहेर काढले. इतकेच नाही, तर चक्क दोन नानी, वायर असे साहीत्य गायीच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.


या वेळी देशी गाय रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावरे रस्त्याने जात असताना पॉलिथिन चघळायला लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. पॉलिथिनचा स्वैर वापर टाळणे आवश्यक असल्याचे डॉ. आर.एम. पुरी, पशूचिकित्सक, लोहा यांनी सांगितले.
रस्त्यांवर बेवारसपणे फिरणाऱ्या जनावरांसाठी प्लास्टिक अतिशय घातक ठरत आहे.

अशा जनावरांची जबाबदारी महापालिका प्रशासनाने गोशाळांना दिल्यास काही प्रमाणात ही समस्या नियंत्रणात येईल. याशिवाय प्लास्टिकचा वापर आणि प्लास्टिकच्या विल्हेवाटीबाबत नागरिकांनीही विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. प्लास्टिकसारख्या गोष्टीचा वापर करताना आपले बेजबाबदार वर्तन पशुधनास किती घातक ठरू शकते, याचेच उदाहरण म्हणजे या गाईवरील शस्त्रक्रिया आहे.


प्लॅस्टिक वेस्टेज सोबतच जर प्रत्येक नवीन उभ्या राहणाऱ्या गृहसांकुलस जर घन कचरा व्यवस्थापनाचे तसेच घन कचरा विल्हेवाटिचे सोपे उपाय उपलब्ध केल्याशिवाय परवानगी, बांधकाम पुर्तता प्रमाणपत्र सरकारने देउच नये. नवी दिल्ली मुनिसिपल प्रशासनाने काही वर्षापूर्वी हा उपक्रम राबविल होता. पुढे तो उपक्रम गुंडाळला गेला आणि समस्या तशीच राहिली. प्लास्टिक बंदी करण्यापेक्षा प्लास्टिक डिस्पोज़ल सिस्टम विकसित करून लोकापर्यंत पोहोचवावी. म्हणजे बेवारस जनावरे आणि पर्यावरण दोघेही सुरख्शित राहतिल. अशा प्रतिक्रीया डॉक्टरांनी दिल्या.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.