Abdul Sattar : किशोर बलांडेच्या पाठीमागे मोठ्या अदृश्य शक्तीचा हात....पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दाव्याने खळबळ

Abdul Sattar : फुलंब्री विधानसभा निवडणुकीसाठी किशोर बलांडे यांच्या पाठीमागे मोठ्या अदृश्य शक्तीचा हात असल्याचा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत बलांडे यांची तयारी आणि विजयावर चर्चा सुरू आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar sakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री विधानसभेसाठी शिवसेनेकडून धनुष्यबाणाचे चिन्ह किशोर बलांडे यांना देण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. जर धनुष्यबाणाचे चिन्ह नाही मिळाले तरी ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांच्या पाठीमागे मोठ्या अदृश्य शक्तीचा हात असल्याचा गौप्य स्फोट पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.फुलंब्री विधानसभेसाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून माजी सभापती किशोर बलांडे यांनी मंजूर करून घेतला.

या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, हा निधी तुमच्या मतदार संघासाठी बयाना आहेत. किशोर बलांडेचे काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, तुम्हाला जर बलांडे यांची काम करण्याची पद्धत आवडली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. मी किशोर बलांडे यांना शब्द दिला असून फुलंब्री विधानसभेसाठी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

मी दिलेला शब्द नेहमीच पाळतो. त्यामुळे चिन्ह नाही मिळाले तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची काळ्या दगडावरची ही पांढरी रेष आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बलांडे यांच्या पाठीशी मोठ्या दृश्य शक्तीचे हात असून या निवडणुकीत ते लढणार आणि जिंकणारच असल्याचा दावा सत्तार यांनी केला. किशोर बलांडे यांना विजयी करण्यासाठी माझेही सातत्याने प्रयत्न राहणार असून विजय झाल्यानंतर मला विधानसभेत जोडीदार म्हणून बलांडे राहील. सत्तारांच्या या दाव्यामुळे मित्रपक्ष असणाऱ्या भाजपमध्ये आता तर्कवितर्क लावणे सुरू झाले आहे.

भुमरे मामा दिल्लीत गेल्यामुळे पालकमंत्री पद मिळाले

छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीत भुमरे मामांना विजयी करणे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजयी करून दिल्लीत पाठवण्यासाठी आम्ही तयारी केली होती. भुमरे मामा दिल्लीत गेले तरच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळेल याची मला जाणीव असल्याने आम्ही सर्व बाजूने प्रयत्न करून भुमरे मामांना दिल्लीत पाठवून दिल्लीच्याना घरी बसवून, मी छत्रपती संभाजी नगरचा पालकमंत्री झालो. मला औरंगाबादचे पालकमंत्री होता आले नसले तरी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होता आले असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अदृश्य शक्तीने निवडणूक जिंकणारच

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की किशोर बलांडे हा फुलंब्री विधानसभेसाठी मागील गेल्या वर्षापासून तयारी करीत आहे. त्याच्या पाठीमागे माझ्यापेक्षाही मोठ्या अदृश्य शक्तीचा हात असल्याचा दावा सत्तार यांनी केला. त्यामुळे बलांडे निवडणूक लढून जिंकणारच असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.