अजून पाच आमदार शिंदे गटात येणार; अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा परभणी येथे दावा
Abdul Sattar
Abdul SattarTeam eSakal
Updated on

परभणी : शिवसेनेच्या १२ आमदारांपैकी पाच आमदार व उर्वरित खासदार लवकरच आमच्या शिवसेनेत दाखल होतील, असा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता.२४) येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. येथे शिवसेनेचा (शिंदे गट) हिंदू गर्व गर्जना मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास कृषिमंत्री सत्तार, उपनेते विजय नहाटा, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्हा प्रमुख माधव कदम, उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे, भास्करराव लंगोटे, दिनेश परसावत आदींची उपस्थिती होती.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘मागील अडीच वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा आहे. आता शेवटच्या वर्षांत जोरदार बॅटिंग करून विकासकामे सुरू केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामाचा वेग पाहून त्या गटातील अजून पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. काही खासदारही योग्य वेळेची वाट पाहून या गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना कुणाची हा प्रश्नच उरत नाही. मराठवाड्यातील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, या भागातील प्रगतिशील शेतकरी व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यावर काम केले जात आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.’’

आरेऽऽ ला कारेऽऽ ने उत्तरे द्या!

परभणी जिल्ह्यात आमदार, खासदार हे ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या भाषणाचा धागा पकडत कृषिमंत्री सत्तार यांनी या पुढे घाबरू नका! गोरगरिबांना न्याय देण्याच्या कामात कुणी आडकाठी करीत असेल तर ‘आरेऽऽला कारेऽऽने उत्तर द्या! आपली ताकद दाखवून द्या’, असे खुले आव्हानच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.

सत्तारांना दाखविले काळे झेंडे

पूर्णा : तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यासाठी हजारो जणांनी शनिवारी गर्दी केली होती. पोलिसांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम व इतर सात-आठ जणांनी ताफ्याकडे जात कृषिमंत्र्यांना निवेदन दिले. त्यांनीही गाडीतून उतरत हसतमुखाने निवेदन स्वीकारले. यावेळी ‘पन्नास खोके एकदम ओके, चाळीस गद्दारांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, तालुक्यात दुष्काळ जाहीर करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, मंत्र्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.