'जाहिरातींवर १६० कोटींचा खर्च, कर्जबाजारी शेतकऱ्यांना सोडलं वाऱ्यावर'

पीकविम्यात कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. याचा फटका राज्यातील दीड लाख कुटुंबांना बसला आहे, असंही आमदार पवार म्हणाले
abhimanyu pawar
abhimanyu pawarabhimanyu pawar
Updated on
Summary

पीकविम्यात कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. याचा फटका राज्यातील दीड लाख कुटुंबांना बसला आहे, असंही आमदार पवार म्हणाले

औसा (लातूर): कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ केली. मात्र, यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. उलट कर्जबाजारी शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने १६० कोटी रुपयांची जाहिरातबाजीवर उधळपट्टी केली, असा आरोप आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला. (bjp mla abhimanyu pawar on state government)

आमदार पवार यांनी पत्रकात म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा विधिमंडळात केली. त्याला दीड वर्षे झाले. पण, शेतकऱ्यांच्या झोळीत अजून खडकूही पडला नाही. खोट्या आणि मोठेपणाचा टेंभा मिळविणाऱ्या जाहिरातींवर १६० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा १५० कोटी शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले असते तर कर्जाच्या खाईत पडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. बांधावर जाऊन पोकळ आश्वासने देणाऱ्या ठाकरे सरकारने प्रत्यक्षात वीजदर वाढवून समस्या वाढविल्या. पीकविम्यात कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. याचा फटका राज्यातील दीड लाख कुटुंबांना बसला आहे, अशी टीकाही त्यांनी पत्रकातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.