मराठवाडा
Phulambri Rain Water : पिंपळगावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली..! खरिपातील पिकांचे नुकसान
पिंपळगाव परिसरात पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम झाल्याने चार ते पाच फूट रस्ता जमिनीपासून उंच आहे. पिंपळगाव परिसरात सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यात मका, ऊस, कपाशी, मूग व अद्रक आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील गेल्या दोन महिन्यापासून पिकात हे पाणी साचलेले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.