परभणी : संपूर्ण जगाला हैराण करुन सोडलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा जोर आता कमी होताना दिसत आहे. परभणी जिल्ह्यातही Parbhani Corona Updates कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. तब्बल साडेसहाशे गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. परंतु त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाने Corona कहर केलेला असतानाही जिल्ह्यातील ११० गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्यापही झालेला नाही. या गावांतील ग्रामस्थांनी केलेल्या उपाय योजनांमुळे आजही गावे पूर्णतः सुरक्षित आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर झाला होता. तब्बल ५१ हजाराच्या वर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील १ हजार २८४ लोकांना या महामारीत स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. above 110 villages of parbhani district prevented corona
जवळपास ४९ हजारांच्यावर लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात एकूण ८०४ गावे आहेत. यातील बहुतांश गावामध्ये बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. मे महिन्यात शहरी भागातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. नवीन बाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी सुटकेचा निःश्वाश सोडला. शनिवारी (ता.दहा) जिल्ह्यात केवळ ११९ अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत. अद्यापही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही अशी गावे गंगाखेड Gangakhed तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २९, जिंतूर Jintur व पालम Palam २१, सोनपेठ Sonpeth १२, पाथरी Pathari ८, पूर्णा Purna ६, सेलू Selu ५, परभणी Parbhani आणि मानवत Manavat ४ आदी.
१०० पेक्षा जास्त रुग्णांची ३१ गावे
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यात काही गावांमध्ये तर हा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यात १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या गावांची संख्या ३१ आहे. त्यात परभणी तालुक्यातील सर्वाधिक १३, पूर्ण २, गंगाखेड २, मानवत ३ आणि सेलू १ आदी गावांता १०० पेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे.
चार लाखांच्यावर लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५५ हजार ९४९ लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ३ लाख ६५ हजार ७६१ जणांना पहिला, तर ९० हजार १८८ लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ५८९ पुरुष, तर २ लाख १२ हजार ३१४ स्त्रियांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. या गटातील एक लाख ६२ हजार ८९२ लोकांना डोस घेतला आहे, तर ४५ ते ६० वर्ष वयोगटातील १ लाख ४७ हाजर ६६३ लोकांना डोस घेतला आहे. तर ६० वर्षाच्यावरील वयोगटातील १ लाख ४५ हजार ३८४ लोकांनी डोस घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.