Beed: दुर्दैवी घटना, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Latest Marathwada News | नगर येथे दुचाकीने गेलो होता. तेथील काम आटोपल्यानंतर रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता.
Beed: दुर्दैवी घटना, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Updated on

Latest Asthi News: शहरात कामासाठी असलेल्या व काम आटोपून परत गावी परतणा-या तरूणाच्या दुचाकीला बसने समोरासमोर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. सोमवारी (ता. 29) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. संदीप आश्रुबा आंधळे (वय ३० वर्षे, रा. लिंबोडी) असे मृत तरूणाचे नाव आहे.

तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आश्रुबा आंधळे याच्याकडे एक टेम्पो असून त्याचा थकीत हप्ता भरण्यासाठी संदीप सोमवारी दुपारी नगर येथे दुचाकीने गेलो होता. तेथील काम आटोपल्यानंतर रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.