Accident : मोटार नाल्यात कोसळून पाच ठार; पाच जखमी, मृतांत दोन मुलांचा समावेश

समोरील टायर फुटल्याने कार नाल्यात कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.
Accident
Accidentsakal
Updated on

भोकर - समोरील टायर फुटल्याने कार नाल्यात कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. मोघाळी-हळदा गावालगत गुरुवारी (ता. ८) मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरहून उमरीमार्गे गुरुवारी (ता. आठ) रात्री ब्रेझा कारने तेलगंणाकडे जात असताना भोकरला नातेवाइकांच्या घरी कार्यक्रम आटोपून एक कुटुंब तेलंगणाकडे निघाले होते. मध्यरात्री समोरचे टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार पुलावरून नाल्यात कोसळली.

कारमधील काहींनी आरडाओरड केल्याने शेतकरी मदतीसाठी धावून आले‌. येथील पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले.

यातील सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (८, दोघी रा. रेणापूर, ता. भोकर) व सुशील मारोती गायकवाड (९, रा. रामखडक, ता. उमरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव (३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (२८), श्याम तुकाराम भालेराव (३५, तिघेही रा. रेणापूर, ता. भोकर) यांना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.

रुग्णालयात पोचण्यापूर्वी रेखाबाई भालेराव, अंजनाबाई भालेराव यांचादेखील मृत्यू झाला. गंभीर जखमी श्याम भालेराव यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव ( ९), प्रितेश परमेश्वर भालेराव (८), सोहम ज्ञानेश्वर भालेराव ( ७), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (२८) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतकरी धावले मदतीला -

रात्रीची वेळ व नाल्यात भरपूर पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्यास अडचणी येत होत्या. काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही शेतकरी मदतीसाठी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढले व भोकर पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()