Accident : तीन वाहनांचा अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, दोन तरुणांचा मृत्यू!

Dharashiv Accident: उमरगा - लातूर मार्गावर बाबळसुर पाटीजवळ झाला अपघात
तीन वाहनांचा अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, दोन तरुणांचा मृत्यू!
Accident latursakal
Updated on

लातूरहुन उमरग्याकडे निघालेल्या इनव्हा कारला पिकअॅप टेम्पोने धडक दिल्याने कारमधील दोन तरूणांचा मृत्यु झाला. शुक्रवारी (ता. सात) रात्री आठच्या सुमारास उमरगा - लातूर मार्गावर बाबळसूर पाटीजवळ हा अपघात झाला. दोघेही तरूण मातोळा (ता. उमरगा) येथील रहिवाशी आहेत.

या बाबतची प्राथमिक माहिती अशी की, उमरग्यातील डॉ. बुटुकने यांची इनव्हा कारची सर्विसिंग करण्यासाठी कारचालक दत्तात्रय गोविंद गिरी वय ३२ लातूरला गेले होते, त्यांच्या सोबत निखील नामदेव भोसले वय १८ होते.

तीन वाहनांचा अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, दोन तरुणांचा मृत्यू!
Accident News : बस-कंटेनरच्या धडकेत तेरा प्रवासी जखमी चालक गंभीर

दोघेही रा. मातोळा) कारचे काम झाल्याने परत दोघे उमरग्याकडे निघाले होते. बाबळसूर पाटीजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या पिकअॅप टेम्पोने कारला धडक दिली. धडक जबरदस्त असल्याने कार पिकअॅप टेम्पोच्या पाठीमागील ऑयचर टेम्पोला धडकली. तेंव्हा टेम्पो चालक अमीन शेख रा. लातूर हा खाली पडल्याने किरकोळ जखमी झाला आहे.

तो उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मातोळ्याचे सरपंच विलास गिरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी व नंतर उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मयत झालेला दत्तात्रय गिरी हे डॉ. बुटुकने यांच्या कारचे चालक होते तर निखील हा आयटीआय कॉलेजचा विद्यार्थी आहे. गावातील दोन्ही तरुणांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

तीन वाहनांचा अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, दोन तरुणांचा मृत्यू!
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com