Acting : जालन्याचा संकेत झळकतोय नवनाथांच्या मालिकेत

चित्रपट, मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद
sanket
sanketsakakl
Updated on

भोकरदन - जालना येथील संकेत सचिनराव देशमुख या युवकाने देखील लहानपणापासूनच अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. घरात अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना त्याने या क्षेत्रात पाऊल ठेऊन मेहनत घेतली. आज तो विविध चित्रपट, सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेल्या गाथा नवनाथांची मालिकेत तो झळकत आहे.आजच्या डिजिटल युगात रिल्सच्या माध्यमातून अनेक जण झळकत आहेत, व्हायरल होत आहेत.

मात्र नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करून त्यात करिअर करणे प्रचंड मेहनतीचे काम आहे. अशा स्थितीत अभिनयाच्या क्षेत्रात संकेत देशमुख आपली चमक दाखवीत आहे.

sanket
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

जालना शहरातील गांधी चमन येथे वास्तव्य असलेल्या संकेत देशमुख याने आपले शालेय शिक्षण सरस्वती भुवन शाळेतून पूर्ण केले.बारवाले महाविद्यालयातून बी.एससी पूर्ण केल्यावर पुणे येथील अभिजित चौधरी संचलित स्वतंत्र थिएटरमधुन आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली.

sanket
Jalna News : पोळा सणावर दुष्काळाचे सावट अंबड नदी,नाले पाण्यावाचून कोरडेठाक

येथे चार वर्ष विविध नाटकात वैविध्यपूर्ण भूमिकेतून आपले कौशल्य दाखवले. ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिकेतून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एका उपग्रह वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत ‘भर्तरीनाथ’ या रुपात त्याने पदार्पण केले असून त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत

sanket
A Raja Video : 'हिंदू धर्म जगासाठी धोका'; DMK खासदार ए. राजा यांचं वक्तव्य! व्हिडिओ होतोय व्हायरल

आहे.संकेत त्याच्या अभिनयाचे पूर्ण श्रेय त्याच्या आईला देत असून वडील लहानपणीच वारले असताना आईने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.