हिंगोली : तालुक्यातील नर्सी येथील संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे जिल्हा नियोजन समितीत मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या कामांची प्रशासकिय मान्यता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे.
नर्सी नामदेव येथे सन २०२० मध्ये संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंती कार्यक्रमासाठी प्रशाकिय पातळीवर जोरदार तयारी सुरु होती. मात्र कोविडमुळे मोठा कार्यक्रम घेता आला नाही. त्यानंतर ७५० व्या जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समितीची देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार कोविडची परिस्थिती पाहून कामे केली जात आहेत.
हेही वाचा - वसमतच्या खाजमापूरवाडी येथे गावकऱ्यांना मिळणार शुद्ध पाणी
दरम्यान, या ठिकाणी भाविकांची सोय व्हावी यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हा शासनाकडे पाठपुरावा करुन विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे. या शिवाय २५ कोटी रुपयांचा आराखडा देखील मंजूर करण्यात आला आहे. या सोबतच जिल्हा वार्षिक योजनेतून पर्यटन विकासासाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करणे या अंतर्गत ३. २९ लाख रुपयांच्या पाच कामांना मंजूरी देण्यात आली होती.
यामध्ये नर्सी नामदेव येथे मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ९९. ८३ लाख रुपये तर संत नामदेव महाराज पालखी मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविणे ९९. ८६ लाख रुपये या कामांचा समावेश होता. या दोन्ही कामांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रशासकिय मान्यता देखील दिली होती. मात्र सदर कामे २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात समाविष्ट नसल्याने सदर कामांची प्रशासकिय मान्यता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जयवंशी यांनी घेतला आहे.
येथे क्लिक करा - Ask Me Anything' सेशनदरम्यान चाहत्याने विचारला प्रश्न
या संदर्भातील आदेश ता. ३० एप्रिल रोजी काढले आहेत. या संदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याशी संपर्क साधला असता मंदिर परिसरालगत काळी जमिन असल्याने त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर ठिकाणी सिमेंट रस्ता करणे योग्य ठरु शकते. त्यामुळे ही कामे रद्द केली असली तरी पेव्हर ब्लॉक ऐवजी सिमेंट रस्ता तयार करण्याकरीता पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.