मरणानंतरही मिळेना स्मशानभूमी! तहसीलसमोर कुटुंबीयांनी आणला महिलेचा मृतदेह

दलित कुटुंबाची वेदना ऐकल का प्रशासन !
Dalit And Their Lives In Maharashtra
Dalit And Their Lives In Maharashtraesakal
Updated on

किल्लेधारुर (जि.बीड) : स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे दलित महिलेचा मृतदेह कुटुंबीयांनी मंगळवारी (ता.आठ) सकाळपासुन तहसीलसमोर (Killedharur) ठेवले आहे. तालुक्यातील गावंदरा येथील सरुबाई मारोती सौंदरमल (वय ८०) यांचे सोमवारी (ता.सात) सायंकाळी ८ वाजता वृध्दापकाळाने मृत्यु झाला. वहीवाटीप्रमाणे ओढ्याच्या बाजुस असलेल्या शेतात दलितांची (Dalit) स्मशानभुमी आहे. मात्र त्यावर दत्तात्रय बडे या शेतकऱ्याने अतिक्रमण करुन ऊस लावला आहे. त्यामुळे दलित महिलेच्या (Dalit Woman) अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात वाद निर्माण झाला. शेवटी सौंदरमल कुटुंबीयांनी न्याय मागण्याच्या हेतुने तहसीलसमोर मृतदेह आणले. (After Death No Crematorium For Dalit Woman In Killedharur Taluka Of Beed)

Dalit And Their Lives In Maharashtra
आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराने लेकीचा मृत्यू

वाद संपविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गणेश बडे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश कोकाटे, मानवी हक्क अभियानाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राम शेंडगे, बाबासाहेब सौंदरमल, तात्याभाऊ सौंदरमल, दिलीप पायके, राहुल मोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अकरापर्यत (Dalits In Maharashtra) प्रश्न मार्गी लागला नव्हता. (Beed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.