Beed News : तारीख टळली; ‘ज्ञानराधा’कडून पुन्हा वेळापत्रक ; ठेवीदारांची तारांबळ,यापूर्वी दोनदा दिलेले आश्वासन हवेतच विरले

जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रातील आघाडीच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ठेवीदारांना पैसे वाटपासाठी दिलेली जानेवारी महिन्यातली आणि एक फेब्रुवारी या दोन्ही तारखा टळल्या आहेत.
beeed
beeedsakal
Updated on

बीड : जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रातील आघाडीच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ठेवीदारांना पैसे वाटपासाठी दिलेली जानेवारी महिन्यातली आणि एक फेब्रुवारी या दोन्ही तारखा टळल्या आहेत. आता पैसे वाटपाचे वेळापत्रक सोमवारपासून (ता. पाच) जाहीर करण्याचे ज्ञानराधाकडून सांगण्यात आले, तर ‘साईराम अर्बन मल्टिस्टेट’च्या मुख्य कार्यालयाला आणि शाखांना अद्यापही टाळेच आहेत. यामुळे ठेवीदारांची आर्थिक तारांबळ उडत आहे.

द कुटे समूहाची ऑक्टोबर महिन्यात आयकर विभागाने तपासणी केल्यानंतर समूहाचे प्रमुख असलेल्या व अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून ठेवींसाठी झुंबड उडाली. पहिला आठवडा ठेवीदारांना पैसे वाटप करण्यात आले. नंतर पुढील तारखांचे धनादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरात ५० शाखांचे जाळे, साडेसहा लाख खातेदार व तीन हजार कोटींहून अधिक ठेवी असा व्यवहार असलेल्या या मल्टिस्टेटचे अर्थचक्र चार महिन्यांपासून ठप्प आहे. आता तर बीडमधील मुख्य कार्यालयासह शाखांनाही टाळे लागले आहेत. सुरवातीपासून ग्राहक व ठेवीदारांना विश्वास देणाऱ्या या मल्टिस्टेटचे प्रमुख सुरेश कुटे यांनी दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या द कुटे समूहाचे स्टेक दुबईच्या रॉयल फॅमिलीला विकले असल्याचे जाहीर केले होते.

beeed
Beed : नाटकांसह दिग्गज कलावंत बीडकरांच्या भेटीला ; आज विभागीय नाट्यसंमेलन,नाट्यदिंडीने सुरवात

डिसेंबरअखेर पैसे मिळतील, असा विश्वास दिला होता. मात्र, तेव्हाही पैसे मिळाले नाहीत. पुन्हा त्यांनीच जानेवारी महिन्यात ठेवीदारांना पैसे देण्याचे दिलेले आश्वासनही फोल ठरले असून, काही दिवसांपूर्वी आंदोलन झाल्यानंतर एक फेब्रुवारीपासून ठेवी दिल्या जातील, असे सहकार विभागाच्या मध्यस्थीने दिलेल्या लेखी आश्वासनाची तारीखही टळली आहे. हातावर पोट असणारे, गंभीर व अत्यावश्यक शस्त्रक्रिया करावयाची गरज असलेल्या ग्राहकांना खेटे मारावेच लागत आहेत.

आता नजीकचा वायदा

सुरेश कुटे यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून द कुटे ग्रुपच्या माध्यमातून काही फंडिंग हाउसमधून पैसा उभा केल्याचे सांगितले आहे. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले, तर दुसऱ्या व्हिडिओतून सोमवारच्या दरम्यान कधी व कशा पद्धतीने पैसे देणार याचे लेखी वेळापत्रक सादर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

द कुटे समुहाच्या माध्यमातून फंड उभारल्याची सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. लवकरच ठेवीदारांना किती टप्प्यात व कधी पैसे मिळणार, याचे वेळापत्र देऊन ठेवी वाटप सुरु केल्या जातील.

— सुरेश कुटे, अध्यक्ष, ज्ञानराधा मल्टीस्टेट, बीड

‘साईराम’ची चिडीचुपच

शहरातील आघाडीचे व्यावसायिक शाहिनाथ परभणे प्रमुख असलेल्या साईराम अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवहारही महिनाभरापासून ठप्प आहेत. २० शाखा व ४० हजार ग्राहक असलेल्या साईरामच्या प्रमुख कार्यालयासह काही शाखांना तीन महिन्यांपासून लागलेले टाळे आजही तसेच आहेत. या मल्टिस्टेटच्या १५२ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी १८ कोटी ठेवी महिनाभरात वाटप केल्याचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे यांचे म्हणणे आहे. या मल्टिस्टेटकडून ८५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता शाखा व मुख्य कार्यालय बंद असल्याने ठेवीदारांचा जीव टांगणीला लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.