हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात  आंदोलन व निदर्शने

file photo
file photo
Updated on

हिंगोली : हिंगोलीत पेट्रोल, डिझेल वाढ व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १२) शिवसेनेच्या वतीने रँली काढून निषेध करण्यात आला.

अगोदरच महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला असताना पुन्हा पेट्रोल-डिझेलची वाढ झाल्याने नागरिकांचे आर्थिक बजेट ढासळत चालले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात शनिवारी  मोर्चा काढून निषेध केला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही निषेध करून राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान शिवसेना कार्यालय ते गांधी चौकापर्यंत काढलेल्या मोर्चा काढण्यात आला. 

देशभरात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास विरोध करताना रावसाहेब दानवे यांनी हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून त्याच्या पाठीमागे चायनाचा आणि पाकिस्तानचा हात आहे असे अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल व पेट्रोल- डिझेल दरवाढीबद्दल शिवसेनेने रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन व निदर्शने केली.

यावेळी आमदार संतोष बांगर, उद्धव गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, रामभाऊ कदम, गुड्ड बांगर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, कडूजी भवर, साहेबराव देशमुख, समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, सुभाषराव बांगर, महिला आघाडी जिल्हासंघटक रेखा देवकते,  जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिल्लारे,  संजय मंदाडे, साहेबराव जाधव बंडू पाटील, गजानन काळे, संतोष सारडा, अनिल देव, शिवराज पाटील, मयूर शिंदे, अतुल बुर्से, राजू संगेकर, सुहास पाटील, दादाराव डुरे, सुशीला आठवले, निर्मला पाटोळे, उषा जाधव, वंदना कारंजकर, प्रताप काळे, गंगाधर पोले, शंकर यादव, पांडुरंग टेकाळे, गोविंदराव मुटकुळे, सदाशिव इंगोले, बालाजी गावंडे, शंकर लोथे, दत्तराव इंगळे, दशरथराव घोंगडे, लखन शिंदे, श्याम महाराज, बंडू घुले, बाबुराव साबळे, बाळासाहेब पोले, प्रभाकर हाके, राजू कराळे, यादवराव घुगे, बंडू चोंडेकर, प्रल्हाद डोरले, माधव गोरे, संतोष काटे, बळीराम जाधव, मनोज देशमुख, गजानन गुठ्ठे, मोहन जाधव, रमेश राठोड, गजानन पवार, सुदाम राठोड, विश्वनाथ भुसारे, धर्मा राठोड, मोहन जाधव, रमेश राठोड, गजानन पवार, शेषराव चव्हाण, विश्वनाथ पांढरे, गोवर्धन जाधव, रमेश पवार, सुरेश पवार, बाबुराव  सुकळकर, शामराव फटींग यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()