- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगांव - गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणा-या पाऊसामुळे पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा नव्वद टक्के पेक्षा जास्त झाल्याने मराठवाड्यातील शेती सिंचनाचा प्रश्न सुटला. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी सिंचनाखाली आणणारी मुळ ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजना व त्यांच नावाने पुढे मान्यता मिळालेली ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन भाग एक टप्पा दोन योजनेच्या प्रतिजलाघात यंञणेसाठी आवश्यक उपकरणे संकल्पन, उत्पादन पुरवठा, उभारणी व चाचणीच्या कामासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ जलसंपदा विभागाने दोन कोटी, अठ्याहत्तर लाख, अडतीस हजार आठशे पंधरा रूपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लोहगाव परिसरातील तोडोंळी, धुपखेडा, दिन्नापूर, गावातील एक हजार हेक्टर वाढीव क्षेत्र लवकरच ओलिताखाली येणार आहे.