वसमत येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली ड्रोन व्दारे ऊसाची फवारणी

कमी श्रम, कमी खर्च वेळेची बचत करीत ऊसासह इतर पिकावरील रोग नाहिसा करुन शेतकर्यांचे या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पुर्णा सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला
Agriculture news Spraying of pesticides sugarcane drone in presence of farmer Wasmat
Agriculture news Spraying of pesticides sugarcane drone in presence of farmer Wasmatsakal
Updated on

वसमत (जि. हिंगोली) : कमी श्रम, कमी खर्च वेळेची बचत करीत ऊसासह इतर पिकावरील रोग नाहिसा करुन शेतकर्यांचे या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पुर्णा सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. रविवारी ता.१७ भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या व शेकडो शेतकर्यांच्या उपस्थितीत ऊसाची ड्रोन द्वारे फवारणी करुन यशस्वी प्रात्यक्षिक केले. ड्रोन द्वारे पिक फवारणीस महाराष्ट्रातील कोल्हापूर .सांगली ,सातारा नंतर वसमत येथील पुर्णा कारखान्याने पुढाकार घेतला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नवनविन तंत्रज्ञान वापरुन प्रयोग करीत असतात. नैसर्गिक लहरीपणाचा नेहमीच शेतकय्रांना आर्थिक फटका बसत असतो. यात विविध किडींचे प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात घट होत असते. किडीचा प्रादुर्भाव कमी श्रमात, कमी खर्चात व कमी वेळेत करता यावा यासाठी पुर्णा ने शेतकर्यांर्यासाठी ड्रोन द्वारे औषधी फवारण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

ड्रोन फवारणीचे फायदे

ड्रोन द्वारे औषधी फवारणी केल्यामुळे पिकावर सारख्या प्रमाणात निविष्ठाची फवारणी होते. उसावर फवारणी केल्यामुळे पाणाची प्रत सुधारते.तसेच पिकाची अन्नसंचयन करण्याची कार्यक्षमता वाढते. अवघ्या ५ मिनिटांत एक एक्करवरील पिकांची फवारणी होते. त्यासाठी औषधी वगळता ७०० रुपये प्रती एकरी खर्च येतो.

गट शेती किंवा सामुहिक शेतीला जास्त फायदा

ड्रोन द्वारे औषधी फवारणी करण्यासाठी वैयक्तिक शेतकय्रांना परवडणार नाही त्यासाठी गट शेती किंवा सामुहिक शेतीला ड्रोन द्वारे औषधी फवारणीचा जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे पुर्णा ने उपलब्ध करुन दिलेल्या ड्रोन फवारणीचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष ,भारतीय साखर महासंघ.

सध्यातरी छोट्या शेतकर्यांसाठी खर्चिक

ड्रोन द्वारे औषधी फवारणी चे फायदे आहेत परंतू छोट्या शेतकर्यांना ते परवडणारे नाही. सामुहिक व गटशेती करणार्या शेतकय्रांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून २ टक्के अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे, गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी, वसमत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.