बी- बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्या; कृषी अधिकाऱ्याचं आवाहन

शंका दुर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करा
बी- बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्या; कृषी अधिकाऱ्याचं आवाहन
Updated on
Summary

बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहुन घ्या. शेतकऱ्यांनी एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे व किटकनाशके यांची खरेदी करु नये.

हिंगोली : खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे (Seeds), रासायनिक खते (Chemical fertilizers) व किटकनाशके (Pesticides) खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे, बनावट भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशक खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्क्या पावतीसह खरेदी करा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (Agriculture officials have appealed to farmers to be careful while buying kharif seeds and fertilizers)

बी- बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्या; कृषी अधिकाऱ्याचं आवाहन
विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासावी : कुलपती कोश्यारी

पावतीवर शेतकऱ्यांची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन घ्या, पिक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी, खरेदी केलेल्या बियाणांचे वेस्टन पिशवी, टंग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावे. शंका दुर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहुन घ्या. शेतकऱ्यांनी एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे व किटकनाशके यांची खरेदी करु नये. किटकनाशके अंतिम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी, तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष दुरध्वनी ई-मेल, एसएमएस इ.व्दारे देऊन शासनाच्या गतिमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा, कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.

बी- बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्या; कृषी अधिकाऱ्याचं आवाहन
लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन !

शेतकऱ्यांनी आपल्या कृषी निविष्ठा संबंधित तक्रारी तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावे, शेतकऱ्यांच्या या संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर पाच अशा एकूण सहा तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी शक्यतो कृषी निविष्ठांच्या वैयक्तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामुहिक कृषी निविष्ठांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे. जेणेकरुन कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही व कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होईल, तसेच गटामार्फत सामुहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात बचत होईल.

बी- बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्या; कृषी अधिकाऱ्याचं आवाहन
तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र

जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात गुणवत्तापुर्ण व पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी तसेच कृषी निविष्ठांची होणारी साठेबाजी तसेच अधिक दराने विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक असे एकूण सहा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तरी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठां बाबतच्या अडचणी संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांनी केले आहे. (Agriculture officials have appealed to farmers to be careful while buying kharif seeds and fertilizers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.