Assembly Election 2024 : अहमदपूरला इच्छुकांचा बैठका घेण्यावर भर...आमदार रणधुमाळीत उतरण्याची शक्यता

Assembly Election 2024 : अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून इच्छुकांनी बैठका घेण्यावर भर दिला आहे. यंदा आजी-माजी आमदार रणधुमाळीत उतरण्याची शक्यता असून ओबीसी उमेदवारांच्या निवडीवर चर्चा सुरू आहे.
Ahmedpur Assembly Election 2024
Assembly Election 2024
Updated on

अहमदपूर : विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापत चालले आहे. त्यातच इच्छुकांनी बैठका घेण्यावर भर दिला आहे. विविध पक्षातील तसेच अपक्ष इच्छूकही मोर्चेबांधणीला लागत आहेत, या मतदारसंघात आजी-माजी आमदार रणधुमाळीत उतरण्याची दाट शक्यता आहे, अर्थात त्यांच्याशिवाय आणखी कोण अशी राजकीय चर्चाही सुरू आहे.

विधानसभेच्या निवडणुकीची तारीख येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदपूर-चाकूर मतदारसंघात आजी-माजी आमदारांसह इतर इच्छुक उमेदवार आपले नशीब अजमावण्याच्या तयारीला लागले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपणास पडणाऱ्या मताच्या बेरजा आखण्यास सुरवात केली आहे, जिंकण्यासाठी लागणारे मतदान बेरजे स्वरूपात मांडत आहेत.

असे असले तरी येणाऱ्या काळातील निवडणूक ही दुरंगी अथवा तिरंगी असण्याची शक्यता आहे. अहमदपूर - चाकूर विधानसभा मतदारसंघात मागील काळातील निवडणुका अटीतटीच्या झाल्या होत्या. मात्र मागील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जवळपास ३० हजाराच्या फरकाने जिंकली होती.

माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचा राजकीय प्रवास अपक्ष, भारतीय जनता पक्ष व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा आहे, ते अपक्ष असताना दोन वेळा आमदार राहिले आहेत. भारतीय जनता पक्षामधून इच्छुक असलेले माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, बालाजी पाटील चाकूरकर हे ही आमदारकी लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून डॉ.नरसिंह भिकाने इच्छुक असून काही अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष उमेदवारी मिळावी यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत, उमेदवारी न मिळाल्यास मित्रपक्षांना मदत न करण्याचा पवित्राही काहीजण घेताना दिसत आहेत.

यंदा ओबीसी उमेदवाराचाही आग्रह

निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. सकल ओबीसी, अल्पसंख्याक, विमुक्त भटक्या किंवा दलित समाजातील व्यक्तीला महायुती अथवा महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळाली नाही तर सकल ओबीसी बांधवांच्या वतीने एकच अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. असे असले तरी यामधून उमेदवार कोण व त्यास पारदर्शकपणे मदत होणार काय हे मात्र अनिश्चित आहे.

मतदारांचे लागले घडामोडींकडे लक्ष

येणाऱ्या काळात उमेदवारांचा असलेला मतदारांचा वैयक्तिक संबंध, त्यांनी जनतेसाठी केलेली कामे, वरिष्ठ पातळीवरून बंडखोरांना थंड करण्याचे काम, काही प्रमाणात जातीची समीकरण या बाबी उमेदवाराला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. अहमदपूर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतील आजी व माजी आमदारांसह सकल ओबीसीमधून येणारा तिसरा कोण असेल याकडे मतदाराचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.