अजिंठ्याच्या तरुणाने रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करत सैनिक मित्राला मिळवून दिली मदत; लोकेशन ट्रेस...

Chhatrapati Sambhaji Nagar: सावरखेडा ता.सोयगाव येथील तरुण अनिल तेजराव झोंड हा भारतीय सैन्य दलाच्या माउंटेन ब्रिगेडमध्ये गुवाहाटी येथे कार्यरत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar
Updated on

अजिंठा : सावरखेडा ता.सोयगाव येथील तरुण अनिल तेजराव झोंड हा भारतीय सैन्य दलाच्या माउंटेन ब्रिगेडमध्ये गुवाहाटी येथे कार्यरत आहे. भुसावळ ते गुवाहाटी प्रवासादरम्यान त्याचा मोबाईल असाम येथील कोक्राझार येथे रेल्वेतून चोरीला गेला.

Chhatrapati Sambhaji Nagar
Maharashtra Politics: महाविकास आघाडीसमोर पेच! महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या हालचालींना वेग

सैनिकास पोलीस प्रशासन मदत करीत नसल्याने त्याने अजिंठ्यातील आपल्या वर्ग मित्रास फोन करून मदत मागितली. मित्राने रेल्वे मंत्र्यांना ट्विट करीत पोलीस मदत मिळविली. तसेच स्वत: पोलिसांना लोकेशन सांगून तब्बल दीड लाखांचा चोरी झालेला मोबाईल परत मिळविला.

मुलांनी-पत्नीने भेट दिला होता सैनिकास मोबाईल...

वडील आपल्याला नेहमीच भेट वस्तू घेऊन येतात म्हणून आपणही त्यांना त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसी भेट देऊ असे ठरवीत मुलांनी आपल्या गल्यात जमविलेली व आपल्या आईकडील रक्कम घेऊन ४० हजार जमविले. उरलेली रक्कम हप्त्यावर घेउन तब्बल दीड लाखाचा आय फोन- १४ (ता.२५ ) मे २०२३ रोजी सैनिक वडिलांना भेट दिला. मुलांच्या इच्छेखातर सैनिकानेही मोबाईल स्वीकारला.

Chhatrapati Sambhaji Nagar
SSC Exam Result 2023 : नापास झालात?मार्क्स कमी पडलेत? बोर्डाकडून पुन्हा मिळेल संधी

रेल्वेत मोबाईल गेला चोरीला

आसाम सीमेवर कर्त्यव्यावर जाण्यासाठी अनिल झोंड भुसावळ येथून २७ मे २०२३ रोजी गुवाहाटी येथे दिब्रुगढ एक्स्प्रेसने निघाले. त्यांची रेल्वे २९ मे २०२३ ला न्यू बोन्गाई कोक्राझार येथे असताना ते असलेल्या रेल्वे डब्यातून सकाळी चारला त्यांचा आय फोन चोरट्याने शिताफीने लांबवला. झोपेच्या तंद्रीत असलेल्या झोंड यांना मोबाईल चोरी झाल्याचे जाणवताच त्यांनी त्याच, रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडे मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली.

मोबाईल शोधण्यासाठी वर्गमित्राची घेतली मदत

मोबाईल चोरीच्या तक्रारी नंतर पोलीस कोणतीच कार्यवाही करीत नसल्याने व कर्तव्यावर हजर व्हायचे असल्याने त्यांनी अजिंठा येथील आपले वर्ग मित्र विजय पगारे यांना मित्राच्या मोबाईल हून कॉल केला. रेल्वे पोलीस प्रशासन कोणतीच कार्यवाही करीत नसल्याने सांगितले.

विजय पगारे यांनी तात्काळ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांना आपल्या ट्वीटर हँडल द्वारे ट्वीट करून सैनिक मित्राची हकीकत सांगितली. काही तासातच रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून तक्रारीची दखल घेण्यात आल्याचे उत्तर पगारे यांना मिळाले. (ता. ३० ला तात्काळ सदर प्रकरण रेल्वे पोलिसांकडून स्थानिक नलबारी पोलीस प्रशासनाला प्रकरण वर्ग करण्यात आले.

स्वत:च केले लोकेशन ट्रेस..

विजय पगारे यांनी सदर मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून नलबारी पोलीस प्रशासनास दिले. नलबारी पोलिसांनी अनिल झोंड यांना सोबत घेऊन दुर्गम भागातील पोरमाथा या ठिकाणी धडक दिली. मात्र संपूर्ण गाव जमा होऊन गोंधळ घालू लागले. झोंड यांना आसामी भाषा येत नसल्याने काय होतय, हे त्यांना कळत नव्हते. याच संधीचा फायदा घेत चोरटा मोबाईल घेऊन पसार झाला. झोंड यांना घेऊन पोलीस पथक माघारी फिरले.

सायंकाळी मोबाईल लोकेशन नलबारी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू स्पार्क इलेक्ट्रॉनिक नावाच्या दुकानावर दिसायला लागले. पगारे यांनी लागलीच नलबारी पोलीस स्टेशनला लोकेशन कळविले. पोलिसांना बघून मोबाईल चोरटा पळाला, मात्र आता आपण पकडलेच जाऊ, या भीतीने त्याने मोबाईल पोलीस स्टेशनच्या आवारात फेकून पळ काढला. दीड लाखाचा महागडा मोबाईल परत मिळाल्याने झोंड यांचा जीव भांड्यात पडला.

रेल्वे पोलीस प्रशासन मदत करीत नसल्याने मदतीसाठी सैनिक मित्राचा फोन आला. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वर्गमित्राची मदत केल्याचा आनंद आहे.

विजय पगारे, (संचालक ,श्री बालाजी कॉम्प्युटर्स,अजिंठा)

मुलांनी भेट दिलेला महागडा मोबाईल चोरीला गेला. त्यातच रेल्वे पोलीस प्रशासन सहकार्य करीत नव्हते. अशावेळी माझा वर्ग मित्र मदतीला धाऊन आला. परराज्यात त्याने फोनद्वारे केलेली मदत माझ्यासाठी लाखमोलाची ठरली.

- अनिल झोंड, (सैनिक, इंडियन माउंटेन ब्रिगेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.