राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मंगळवारी (ता.०१) शहरात येणार असून यानिमित्ताने लाडक्या बहिणींच्या वतीने अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे,अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.राजेश्वर चव्हाण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परळी विधानसभा अशासकीय समितीचे अध्यक्ष वाल्मिक कराड, गोविंदराव देशमुख, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांसह आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.