परंडा (उस्मानाबाद): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) शुक्रवारी ( ता. १८ ) माजी आमदार राहुल मोटे (rahul mote) यांच्या गिरवली ( ता. भूम ) या गावी भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार-मोटे यांची भेट मोटे यांच्या राजकारणास 'रिस्टार्ट ' करणारी ठरणार अशी चर्चा सुरू झाली असून या भेटीमुळे मोटे यांना मोठे बळ मिळणार आहे. अनेक वर्षेे माजी आमदार कै. महारुद्र मोटे व माजी आमदार राहूल मोटे या पितापुत्रांनी माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील, माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राजकारण केले.
विधानसभा निवडणुकीपुर्वी आमदार पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तर मोटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. तानाजीराव सावंत यांनी मोटे यांचा पराभव केला. मोटे यांच्या पाठीशी डॉ. पाटील यांचे तगडे पाठबळ राहिले नाही. तर कोरोनाकाळात थेट अनेक रुग्णांना भेटून संवाद साधून सक्रिय राहून देखील माजी आमदार मोटे पहिल्या तुलनेत काहीशे मागे राहिल्याचे वाटत होते. शुक्रवारी (ता.१८) उपमुख्यमंत्री पवार यांची होणार भेट माजी आमदार मोटे यांना बळ देणारी ठरणार आहे.
माजी आमदार मोटे यांची ओळख उपमुख्यमंत्री पवार यांचे लाडके सहकारी अशी आहे. भल्याभल्यांना जवळ न करणारे पवार माजी आमदार मोटे यांना कायम उजवा कौल देतात असा अनुभव यापूर्वी अनेक वेळा मतदारसंघात पहावयास मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे जे-जे खाते होते याचा लाभ मतदार संघाला कायम झाला आहे. सध्या माजी आमदार मोटे सत्तेच्या राजकारणाक फारसे सक्रीय दिसत नाहीत. पवार यांची भेट मोटे यांच्या राजकारणाला रिस्टार्ट करणारी ठरणार का ? हे येणाऱ्या काळात पहावयास मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.