उमरगा : सावधान कोरोनाची तिसरी लाट दृष्टीक्षेपात !

उपजिल्हा रुग्णालयातील कोविड उपचाराची यंत्रणा सक्षम करण्याची गरज ; नागरिकांची बेफिकीरीही थांबली पाहिजे.
कोरोना
कोरोना sakal
Updated on

उमरगा : मानवाच्या जीवनशैलीत आता कोण कोणत्या तरी विषाणूचा संसर्ग येतच रहाणार असल्याने प्रत्येकांनी स्वतःच्या काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेची आर्थिक, शारिरिक झळ पोहचलेल्या आणि जीवाभावाच्या व्यक्ती दगावलेल्या अनेकांच्या कुटुंबात कोरोनाची भिती कायम आहे. आता नव्याने ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंटचा विषाणूचा फैलाव वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सावधगिरीच्या उपाययोजनाबरोबरच आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.(Osmanabad news)

कोरोना
‘रॅलींना घाबरू नका; कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी संसाधने’

उमरगा शहर व तालुक्यातील नागरिकांना कोरोना संसर्गाचे कटु अनुभव आलेले आहेत. पहिल्या पेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांना अक्षरक्षः ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने जीव गमवावा लागला होता. लसीकरणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते हे नक्की आहे मात्र संसर्ग आपल्या अंगाशी होऊ नये, याची जबाबदारी प्रत्येकानी स्विकारणे गरजेचे झाले आहे.

कोरोना
भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

सरकारी कोविड उपचाराची यंत्रणा सक्षम करण्याची गरज

उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात ११० बेड ऑक्सिजन बेडशी कार्यान्वित केल्याची माहिती सांगण्यात आली. मात्र दुसऱ्या लाटेत याच रूग्णालयात बाधित रूग्णाच्या मृत्यूची संख्या वाढली होती. ११० बेड पैकी अतिदक्षता विभागात वीस बेड आहेत तेथे चौदा व्हेंटिलेटर आहेत तर सहा बेड नॉन व्हेंटिलेटरचे आहेत. रूग्णालयासाठी फिजीशियन तज्ञ नाही. डॉ. कवठे यांनी राजीनामा दिल्याने नव्याने फिजीशियनची नेमणूक करणे गरजेचे आहे. दरम्यान पहिल्या व दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयात कोविड उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागले होते ; तरीही बरेच रुग्ण दगावले. अवाढव्य बिलाच्या रक्कमेमुळे जीवाभावाची व्यक्ती दगावुनही नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू येत नव्हते. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम केली तर येऊ पाहणाऱ्या तिसऱ्या लाटेत योग्य उपचाराने गरिब कुटुंबातील नागरिकांचे आयुष्यमान वाढेल.( covid care center )

कोरोना
भारतातील ओमिक्रॉनचा पहिला बळी पिंपरी-चिंचवडमध्ये

ऑक्सिजनचा पर्याय उभा रहातोय ....

उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हवेतुन मिळणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झालेले असले तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग अजुन सुरु झालेला नाही. आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पर्यायी उपाययोजना म्हणुन ऑक्सिजनच्या १० के.एल. क्षमतेच्याएलएमओ प्रकल्पाला (लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन) मंजुरी दिली होती. मात्र आता त्याऐवजी २० के.एल. क्षमतेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती सांगण्यात आली. दरम्यान येथील तरुण उद्योजक बालाजी जोळदापके यांनी औद्योगिक वसाहतीत जवळपास साडेचार कोटी खर्चाचा कर्ण इंडस्ट्रीज अन्ड मेडिकल गॅसेस या नावाने दररोज ५५० जम्बो सिलेंडर तयार करण्याचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. या उद्योगाला संबंधित विभागाचा अधिकृत परवानाही मिळाला आहे.

कोरोना
ऑस्ट्रेलियात ओमिक्रॉनचा पहिला बळी

बेफिकीरी थांबली पाहिजे ...

कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण संख्या वाढण्याचा पहिला टप्पा सुरु झाला आहे तो येणाऱ्या पंधरा दिवस, महिनाभरात आणखी वाढण्याची शक्यता दिसते आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत मात्र त्याची अमलबजावणी दिसून येत नाही. आठवडे बाजार असो कि, दररोजच्या बाजारपेठेतील गर्दी ही संसर्गाचे केंद्र होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीरी थांबवून स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

" कोविड उपचारासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन निर्मितीच्या उद्योगाशी प्रशासकिय स्तरावरून करार करण्याचे काम सुरु आहे. फिनिशियन तज्ञाची अर्धवेळ नेमणूकीचा प्रयत्न सुरू आहे. रुग्ण संख्या वाढत राहिली तर त्याचा सामना करण्यासाठी रूग्णालयातील उपचाराची यंत्रणा सज्ज रहाणार आहे.

- डॉ. अशोक बडे, वैद्यकिय अधिक्षक

" कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सामान्य कुटुंबातील रुग्णांचे हाल जवळून पाहिले आहेत. सरकारी यंत्रणेला विनंती करून बऱ्याच गरिब रुग्णांचे उपचार झाले, परंतु बऱ्याच रुग्णांचा मृत्यूही झाला. उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचाराने गरिबांने दिलासा मिळेल, त्यासाठी संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन आतापासुनच नियोजन करायला हवे तरच शिस्त लागेल.

- अशोक बनसोडे, अध्यक्ष संविधान विचार मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.