Beed Rain : परळीतील नद्यांना पूर, नागरिकांना घेतला झाडांचा आधार

बीड - पांगरीजवळील ओढ्याला पुर आल्याने परळी-बीड रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
बीड - पांगरीजवळील ओढ्याला पुर आल्याने परळी-बीड रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.Beed Rain News
Updated on

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्याला (Parli Vaijnath) पावसाने जोरदार झोडपले असून सोमवारी (ता.२७) सायंकाळी व मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे सर्वच नद्यांना पुर आले असून वानटाकळी गावाचा संपर्क तुटला आहे. तर परळी, आंबेजोगाई, परळी बीड ,परळी सोनपेठ रस्ता नद्याला आलेल्या पुरामुळे बंद पडले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री (Rain) ते सकाळी ८ पर्यंत पडलेल्या पावसाने तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावातील नद्यांना महापुर आला असून वानटाकळी गावाचा संपर्क तुटला आहे. वानटाकळी (Rain In Beed) येथे सोमवारी झालेल्या पावसाने नदीच्या पाण्याचा गावाला वेढा पडला. गावाच्या परिसरात ३० ते ४० आखाडे आहेत. या आखाड्यात पाणी घुसल्याने रात्री १२ पासून या परिसरातील नागरीकांनी झाडाचा आसरा घेतला.

बीड - पांगरीजवळील ओढ्याला पुर आल्याने परळी-बीड रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
Osmanabad : मांजरा नदीकाठी १७ जण अडकले,एनडीआरएफ पथक दाखल

१० ते १२ नागरिक रात्रभर झाडावर होते. नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी शेख यांनी पहाटे ४ वाजता गाव गाठले व गावातील नागरीकांना सतर्क केले. परिसराची पाहणी करुन अडकलेल्या नागरीकांना गावकऱ्यांच्या सहकार्याने खाली उतरवले. व नायब तहसीलदार व तलाठी गावातील परिस्थिती वर लक्ष ठेवून गावातच तळ ठोकून आहेत. दरम्यान मध्यरात्री झालेल्या पावसाने परळी-आंबेजोगाई रस्ता बंद झाला असून तात्पुरता तयार करण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. परळी-बीड रस्त्यावर पांगरी गावाजवळील ओढ्याचे पाणी परळी-बीड राज्य रस्त्यावरुन वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. तर संगम येथील नदीला पुर आल्याने परळघ सोनपेठ रस्ता ही बंद आहे. तसेच मलकापूर, गाढे पिंपळगाव, नागापूर आदी गावातील नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

बीड - पांगरीजवळील ओढ्याला पुर आल्याने परळी-बीड रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
राज्यात मुसळधार पाऊस, उस्मनाबादमध्ये NDRF पथक दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.