अंबड,जि.जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जालना-बीड महामार्गावरील लालवाडीफाटा येथे मंगळवारी(ता.31)सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांच्या वतीने महामार्गावर रस्तारोको आंदोलन सुरू केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण ग्रामस्थ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी कुणब्याची पोरं शेतीची अवजारे यामध्ये बैलगाडी,गाय, म्हशी,शेळ्या, औत,नांगर,आसूड,जु,बळीराम, टिकाव,टोपले,फावडे यासह आदी साहित्य घेऊन रस्त्यावर सकल मराठा समाज बांधव न्याय हक्कांच्या लढ्यासाठी एकत्र येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
लहान मुलापासून आबालवृद्ध सहभागी:जालना-बीड महामार्गावरील अंबड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील लालवाडीफाट्यावर मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ एकजुटीने सक्रिय पाठींबा देण्यासाठी लहान मुलापासून ते आबालवृद्ध,तरुण युवक,युवती, महिला संपूर्ण ग्रामस्थांनी घराला कडी,कुलूप लावून रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. लालवाडीफाट्यावरील रस्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.
शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिक्षेकडे फिरविली पाठ:लालवाडीफाट्यावर मंगळवारी सकळी आठ वाजेपासून शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या परीक्षा सुरू असताना परिक्षेकडे पाठ फिरवीत रस्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त: लालवाडीफाट्यावर सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे,पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांच्या वतीने रस्ता रोको आंदोलनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.