लातूर : अंजनपूर कोपरा शिवारापर्यंत पोचले मांजरा धरणाचे पाणी

अंबाजोगाई तालुक्यातील २५ गावांतील शेतकऱ्यांना होणार लाभ
Ambajogai Manjara project Water released into river basin
Ambajogai Manjara project Water released into river basinsakal
Updated on

अंबाजोगाई : धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्पातून बुधवारी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. या पाण्यावर पात्रतील पाच बंधारे भरण्यात येणार आहेत. या पाण्याचा नदीकाठी असलेल्या २५ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

धरणातील १४२ दशलक्ष घनमीटर शिल्लक साठ्यापैकी ११.४७ दलघमी पाणी नदीच्या पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणात १३०.५३ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक राहील. यापूर्वी कालव्यासाठी धरणातून पाण्याचे दोन आवर्तने देण्यात आलेली आहेत. बीडसह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मांजरा प्रकल्पाचा सिंचनासाठी व पिण्यासाठी फायदा होतो. यावर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. अतिवृष्टीत धरणातील पाण्यापेक्षा दुप्पट पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात आला होता.

धरण पूर्ण भरल्यानंतर त्यात २२४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला होता. यातील मागील आठ महिन्यांत बाष्पीभवन वगळता ९३.४७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा सिंचन व पिण्यासाठी वापर झालेला आहे. आता बंधारे भरण्यासाठी नदीपात्रात ११.४७ दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यानंतर जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. याला शाखा अभियंता सय्यद यांनी दुजोरा दिला.

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची होती. त्यामुळे मार्चला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. मांजरा धरणातून नदीत सोडलेल्या पाण्यावर कारसा पोहरेगाव येथे पाच बंधारे (बॅरेज) भरले जाणार आहेत. त्यात लासरा, टाकळगाव, देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव या बंधाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या काळात मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांत आनंद

मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या मांजरा नदीपात्राच्या दोन्ही काठावरील जवळपास २५ गावांना पाण्याचा फायदा होणार आहे. या नदीच्या पात्रात मोठ-मोठे खड्डे आहेत. हे खड्डेही या पाण्याने भरणार आहेत. त्यात अनेक शेतकऱ्यांचे वीजपंप चालतात, म्हणजे फक्त बंधाऱ्यावरचे शेतकरी नव्हे तर इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार असल्याने गावकरी व शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.