Latest marathwada News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असून, एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ते मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मराठवाड्यात बॅकफूटवर गेला. आता येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात चांगलाच फटका बसला. या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने मराठवाड्यात लढवलेल्या आठपैकी सात जागा गमावल्या. हा निकाल त्यांच्यासाठी मोठा धक्काच समजला जातो.
त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. असे असताना मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर, ओबीसी मतांचे विभाजन ही आव्हाने पुन्हा एकदा महायुतीसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती विशेषतः भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
आठशे-नऊशे पदाधिकारी शहरात
एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा संवाद होईल. यावेळी मराठवाड्यातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष अशा आठशे ते नऊशे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीदेखील गृहमंत्री शहा हे शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा घेतली. या सभेत ‘एमआयएम को उखाड फेको, यहाँ से एक कमल दे दो’ असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु, जागा वाटपात ‘छत्रपती संभाजीनगरची’ जागा शिंदे गटाकडे गेली असली तरी एमआयएमचा मात्र पराभव झाला. यामुळे गृहमंत्री शहा यांच्या विधानसभेपूर्वीच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.