नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस पणन महासंघाने किमान आधारभुत किंमतीनुसार कपाशीची खरेदी सुरु केली आहे. जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रावर आजपर्यंत पाच हजार ८७० क्विंटल कपाशीची आवक झाल्याची माहिती पणनकडून मिळाली.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कपाशीला किमान आधारभुत दरानुसार भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस पणन महासंघाचे कापुस खेरदी सुरु केली. जिल्ह्यातील भोकर येथील व्यंकटेश्वरा कॉटन कंपनी व हदगाव तालुक्यातील तामसा येथे नटराज कॉटन प्रा. लि. या दोन जिनींगवर ता. तीन डिसेंबरपासुन कापुस खरेदीला प्रारंभ झाला. कापुस खरेदीचा शुभारंभ पणनचे संचालक नामदेवराव पाटील केशवे यांच्या हस्ते तामसा येथे झाला. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक संदीपकुमार हनवते पाटील, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा - नांदेडात पुन्हा गोळीबार
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर आरटीजीएस व्दारे जमा
भोकर येथील जिनींगवर दोन हजार ९८० क्विंटल तर तामसा येथे दोनहजार ८९० क्विंटल अशी एकूण पाच हजार ८७० क्विंटल कपाशीची आवक झाली. ही कपाशी प्रतिक्विंटल पाच हजार ४५० रुपयानुसार खेरदी करण्यात आली. या कपाशीचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर आरटीजीएस व्दारे जमा करण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कपाशी विक्रीच्यावेळी सातबारा, बॅंकपासबुकची झेरॉक्स तसेच आधारकार्ड सोबत आणावे लागणार आहे.
उघडून तर पहा --किटक नाशके खरेदी व वापर करताना ‘ही’ घ्यावी काळजी
मनुष्यबळाअभावी परिणाम
भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) (ता.१५) ऑक्टोबरपासून राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून खरेदी केंद्र सुरू केले आहे. परंतु, पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून ग्रेडरची संख्याही अल्प आहे. यामुळे खेरदी करण्यासाठी पणनच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.