लातूर जिल्ह्याचे युवा नेता असलेले अरविंद पाटील निलंगेकर हे गत २० वर्षांपासून एकनिष्ठेने भाजपात कार्यरत असून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.
निलंगा (जि.लातूर) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील BJP Maharashtra Unit Chief Chandrakant Patil यांनी प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील निलंगेकर Arvin Patil Nilangekar यांची नियुक्ती केली आहे. त्यांना तसे निवडीचे पत्र दिलेले आहे. प्रदेश सचिवपदी नियुक्ती करताना अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्याकडे राज्यातील शक्ती केंद्र व बुध रचनेची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे.लातूर Latur जिल्ह्याचे युवा नेता असलेले अरविंद पाटील निलंगेकर हे गत २० वर्षांपासून एकनिष्ठेने भाजपात कार्यरत असून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान Lok Sabha Election पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी बूथ पातळीवर कार्य करून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तकालिन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये घेण्यात आलेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक संपूर्ण राज्यभरात झालेले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केले आहे. नियुक्तीचे पत्र देताना अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे महाराष्ट्रातील Maharashtra शक्तीकेंद्र व बुथ रचनेची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. Arvind Patil Nilangekar Appointed As State Secretary Of BJP Latur News
या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षश्रेष्ठीचे श्री.निलंगेकर यांनी आभार व्यक्त करत पक्षश्रेष्ठीनी आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थक ठरवत महाराष्ट्रात सशक्त शक्तीकेंद्र व समर्थ बुथ ही संकल्पना राबविण्यासाठी पूर्णपणे योगदान देत त्यासाठी परिश्रम घेऊ व पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.