Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! परभणीतून पंढरपूरला जाण्यासाठी १३३ बसगाड्या सोडण्याचा निर्णय

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023esakal
Updated on

परभणी: अवघ्या महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वच जण अतूर झाले आहेत. मिळेल ते वाहन.. वेळ प्रसंगी पायी चालत जाऊन सावळ्या विठ्ठलाची मनमोहक मूर्ती डोळ्यात साठविण्यासाठी विठ्ठल भक्त पंढरपूरकडे कूच करत आहेत.

कोणत्याही देशात न होणारा असा भव्य आषाढी सोहळा साजरा करण्यासाठी मग महाराष्ट्राची लालपरी तरी मागे कशी राहणार? पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील ४ आगारांतून १३३ बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Ashadhi Wari 2023
Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरणी एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी यात्रा भरत असते. तब्बल महिनाभर आधीपासून लोक राज्याच्या कान्याकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला जात असतात. दरवर्षी हा सोहळा नयनरम्य ठरत असतो.

लाखो वारकरी हातात भागवत धर्माची पताका घेऊन दिंडीत सहभागी होतात. राज्यभरातून हजारो दिंड्याद्वारे लाखो लोक पायी वारीत सहभागी असतात. दरवर्षी छोट्या मोठ्या अशा ४३ दिंड्या परभणी मार्गे पंढरपूरकडे जात असतात.

परभणी जिल्ह्यातही वारकऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. महिन्याची वारी करणारे ही अनेक जण असतात. मात्र आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपूरकडे जाणारे शेकडो लोक परभणी जिल्ह्यातील असतात.

Ashadhi Wari 2023
Weather Update: उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना भरली धडकी; राज्याला यलो अलर्ट जाहीर

या सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी विशेष बसगाड्याची व्यवस्था करते. कोरोना संसर्गाच्या काळात दोन वर्षे ही बससेवा बंद होती. परंतु, गतवर्षापासून परत मोठ्या जोमाने आषाढी यात्रेची बससेवा महामंडळाने सुरु केली आहे.

यंदाही ही बससेवा येत्या २५ जूनपासून सुरु होणार आहे. त्यासाठी परभणी जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यातील तब्बल १३३ बसगाड्या पंढरपूरसाठी विशेष म्हणून सोडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील चार आगारातून नियोजन

दरम्यान, परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चार आगार आहेत. त्यामध्ये परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड यांचा समावेश आहे. या चार आगारांतून १३३ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

त्याच बरोबर पुरेसा प्रवासी वर्ग मिळाला तर थेट त्या- त्या गावातूनही एसटीची सेवा विठ्ठल भक्तांसाठी देण्यात आली आहे.

पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीच एसटी महामंडळाकडून विशेष बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही ता. २५ जून ते ३ जुलै या दरम्यान बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ता. ३ जुलै रोजी वारी परतीच्या मार्गावर असते. त्यामुळे पंढरपूर येथेही परभणी जिल्ह्यातील आगाराच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.