Ashadi Ekadashi : बिडकिन येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी

Bidkin Latest News : आषाढी एकादशी निमित्त बिडकीन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर मध्ये सावता भजनी मंडळ व गावकरी यांच्या वतीने भव्यदिव्य भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Ashadi Ekadashi : बिडकिन येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
Ashadi Ekadashisakal
Updated on

Bidkin: पुरातन काळातील एकमेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून बिडकिन येथील मंदिराची ओळख आहे.याठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारवाडी गल्ली येथे दोन दिवसांपासून विद्युत रोषणाई तर आज (ता.१७) बुधवार रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे व सायंकाळी महाआरती घेण्यात आली.

Ashadi Ekadashi : बिडकिन येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
Ashadi Ekadashi : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे, वाचा नक्की कुठे घडला प्रकार?

आज सकाळच्या महाआरती पासुन ते संध्याकाळ पर्यंत बिडकिन व परिसरातील खेड्यातील नागरिकांच्या वतीने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त बिडकीन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर मध्ये सावता भजनी मंडळ व गावकरी यांच्या वतीने भव्यदिव्य भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Ashadi

Ashadi Ekadashi : बिडकिन येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
Ashadi Wari : दुःखद घटना! विठ्ठलाच्या दर्शानासाठी निघालेल्या महिला वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू...

भजनाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सर्व वातावरण हे पंढरीमय झाले होते.यावेळी भजनी मंडळाचे सदस्य बंडू खराडकर,मधुकर वाणी,बनकर,अरुण पाटील नरवडे,राजेंद्र शिंदे,बाळू औटी,बाळू सोकटकर,तुकाराम कोथिंबीरे,भाऊसाहेब सोनवणे, अर्जुन तळेकर,डॉ छबिलवाड, डॉ थोरात,बाबुराव वाघ,छगन महाराज तिवाडी,निकम,भागा टेके,तांबोळी,कैलास औटी,पुंजाराम खराडकर,सतीश औटी, आसाराम सर्जे,तसेच पुजारी दिलीप जोशी व सुरेश जोशी आणि बालगोपाल व समस्त गावकरी उपस्थित होते.याक्षणी गावकऱ्यांनी भजनाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.

Ashadi Ekadashi : बिडकिन येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
Ashadi Wari: गजानन महाराजांची पालखी पोहोचली पंढरपुरात, तब्बल 'इतक्या' दिवसांचा केला प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.