Latur Assembly Election 2024 : ‘लातूर ग्रामीण’मध्ये पुन्हा होणार काय तडजोडीचे राजकारण?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींकडे मतदारांचे लक्ष
assembly election latur 2024 political party dispute bjp congress dhiraj deshmukh ramesh karad
assembly election latur 2024 political party dispute bjp congress dhiraj deshmukh ramesh karadSakal
Updated on

रेणापूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणाचा मतदारांना अनुभव आला. त्यातही भाजप समर्थक कार्यकर्त्यांना पक्षाच्या उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.

त्याबाबतचा संतापही मतदानात दिसून आला. विशेष म्हणजे प्रकाराने दुसऱ्या क्रमांकाची मते चक्क नोटाला मिळाली होती. यंदा मात्र काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील राजकीय घडामोडींकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रेणापूर पूर्ण तालुक्याची ८५ गावे लातूर तालुक्यातील ९० व औसा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या वर्ष २००९ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे , २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड.त्र्यंबकनाना भिसे तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे धिरज देशमुख विजयी झाले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा प्रभाव व देशमुख परिवाराची साखर कारखान्यावरील वर्चस्व यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे व भाजपचे रमेश कराड यांच्यात लढत झाली.

त्यावेळी विलासराव देशमुख यांनी स्वतः प्रचारसभा घेतल्यामुळे २० हजाराच्या फरकाने शिंदे विजयी झाले. दुसऱ्या निवडणुकीत वैजनाथ शिंदे यांनी प्रयत्न करूनही त्यांना डावलून त्र्यंबकनाना भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.

तर भाजपने रमेश कराड यांना परत मैदानात उतरवले. या निवडणुकीत कराडांचा निसटता झालेला पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. परंतु राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे रमेश कराड यांनी पुन्हा जोरदार तयारी सुरु केली, कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे मतदारसंघात खेचून आणली.

assembly election latur 2024 political party dispute bjp congress dhiraj deshmukh ramesh karad
Latur : लातुरात व्हायरोलॉजी लॅब कागदावरच; डेंगी संशयितांचे आठ दिवसांनंतर मिळताहेत रिपोर्ट

याउलट आमदार भिसेंना पक्षातंर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता. जिल्हा परिषद , पंचायत समिती व रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले यामुळे वर्ष २०१९ च्या निवडणुकीत कराड आमदार होणार अशी परिस्थिती झाली होती. परंतु एकही सरपंच नसलेल्या शिवसेनेला ही जागा सोडली अन् नवखा व अपरिचित उमेदवार दिल्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला. हे राजकारण तडजोडीचे असल्याची भावना झाली.

त्यात काँग्रेसनेही आमदार भिसेंचा पत्ता कट करत धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मतदारसंघात फिरकलाच नाही. त्यामुळे निकाल काय लागणार हे सर्वांनाच कळले होते.

आपल्याला गृहीत धरले म्हणून मतदारांतही नाराजी पसरली होती. पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्व केले, मग हा मतदारसंघ भाजपने कशामुळे सोडला या प्रश्नांची उत्तर कार्यकर्त्यांना कळाली नाहीत. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी नोटाला मतदान करणे पसंत केले, परिणामी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

assembly election latur 2024 political party dispute bjp congress dhiraj deshmukh ramesh karad
Latur : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल; आठ दिवसांपासून प्रमाणपत्रांबाबत अडचणी

याची भाजप पक्षश्रेष्ठींनी दखल घेत कराड यांना काही महिन्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष केले. एका वर्षातच २०२० मध्ये रमेश कराड यांना विधानपरिषदेवर घेत चुकीची दुरुस्ती केली. अर्थात जनतेतून निवडून येण्याची आमदार कराडांची प्रबळ इच्छा असल्यामुळे ते जोरदार तयारी करत आहेत. मात्र निवडणुकीत पुन्हा तडजोडीचे राजकारण होईल काय याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

भाजपकडून कराड सशक्त दावेदार

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात धीरज देशमुख यांना लढत देण्यासाठी भाजपकडे आमदार रमेश कराड यांच्यासारख्या प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे कराड भाजपकडून सशक्त दावेदार असतील. त्यातही गेल्या वेळेला केलेली चूक भाजपचे पक्षश्रेष्ठी यावेळी करणार नाहीत,

अशी आशा कराड समर्थकांना आहे. विशेष म्हणजे कराड व देशमुख यांच्यातच लढत व्हावी, अशी अनेक मतदारांचीही इच्छा आहे. दोघांत लढत झाली तरच कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळणार आहे. गेल्यावेळेस कार्यकर्त्यांना , मतदारांना कोणी विचारले सुद्धा नाही याचा राग आजही अनेकांच्या मनात आहे.

assembly election latur 2024 political party dispute bjp congress dhiraj deshmukh ramesh karad
Latur Water Storage : ‘मांजरा’च्या १२५ किलोमीटर पात्रात पाणी; होसूरच्या उच्च पातळी बंधाऱ्यातून कर्नाटकात विसर्ग

व्हीआयपी आमदार ठसा पुसावा लागणार

आमदार धिरज देशमुख हे सतत मुंबईत असतात, हा मतदारसंघ ग्रामीण असल्यामुळे गोरगरीब लोकांना ते सहज उपलब्ध होत नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये असते. त्यामुळे त्यांची ओळख व्हीआयपी आमदार झाली आहे. ती पुसण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. याउलट आमदार कराड हे दिवसभर त्यांच्या कार्यालयात बसून असतात, ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटतात ही वस्तुस्थिती आहे.

देशमुखांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून ठराव

काँग्रेसचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना परत उमेदवारी देण्यात यावी असा एकमुखी ठराव काँग्रेसच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे धीरज देशमुख यांची उमेदवारी निश्चितच मानली जात आहे. यामुळे आतापासूनच देशमुख यांनी तयारी सुरु केली आहे. विकासकामांच्या उद्‌घाटनाच्यानिमित्ताने त्यांनी रेणापूर तालुक्यात दौरे सुरु केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()