सरकारने राज्यात चार महिने विधानसभेची निवडणूक पुढे लांबवली आहे. सत्ताधारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील, तेच परत कारभार बघतील हा सरकारचा डाव आहे.
वडिगोद्री : अंतरवाली सराटी येथे होणारी (ता. 29) रोजीची निर्णायक बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक (Assembly Elections) चार महिने पुढे ढकलली असल्याची माहिती मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.