नांदेडातही एटीएम फोडून २६ लाख लंपास 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून २६ लाख ३० हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (ता. १५) च्या मध्यरात्री भावसार चौक परिसरात घडली. विशष म्हणजे या परिसरात नुकतीच एक पोलिस चौकी सुरू करण्यात आली असतांना हा प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून मोठी रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) पोलिसांनी ता. १६ नोव्हेंबर रोजी पर्दाफाश केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच अशाच पध्दतीने नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून २६ लाख ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव मार्गावर काही दिवसापुर्वीच पोलिस चौकी कार्यान्वीत झाली आहे. पोलिस चौकी असतांनाही ता. १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून २६ लाख ३० हजार रुपये चोरुन नेले. या एटीएममध्ये एकुण २९ लाख ३४ हजार रुपये होते. त्यापैकी ग्राहकांनी तिन लाख चार हजार रुपये काढले होते. उर्वरीत रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

पोलिस अधिकारी घटनास्थळी

रविवार (ता. १५) सुटीचा दिवस असल्याने ही घटना पोलिसांना व बँक अधिकाऱ्यांना लवकर समजली नाही. जेंव्हा समजली तेंवहा पोलिस निरीक्षक अनिरुध्द काकडे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर बँक अधिकारी व एटीएम कंत्राटदार यांनाही बोलवून घेतले. एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याचे दिसून येत आहे. एटीएम सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे बालाजी वाघमारे यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. 

दोन वर्षापूर्वी फोडले होते एटीएम

दोन वर्षापूर्वी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने राजस्थानमधील चोरट्यांनी फोडून ५८ लाख रुपयाची रोकड लंपास केली होती. ही रक्कम आपल्या चार चाकी वाहनातून घेऊन जात असतांना बुलढाणा पोलिसांनी तपासणी दरम्यान या टोळीला अटक केली होती. त्यांच्याकडून ५८ लाखाची रोकड जप्त केली होती. त्यातील दोघेजण काही रक्कम घेऊन पसार झाले होते. त्यांनी नागपूर येथे एटीएम फोडून नांदेडमार्गे राजस्थानकडे जात होते. त्यानंतर पुन्हा एटीएम फोडीची घटना घडल्याने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. 

एटीएमची सुरक्षा रामभरोसे

शहरातील एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरटे अगोदर विदर्भात गुन्हा करून ते थेट मराठवाड्यातील नांदेडमार्गे जात असतात. पांढरकवडा येथे ही टोळी जेरबंद झाली. तर दुसऱ्या टोळीने नांदेडातील एटीएम फोडले. बँकेकडून एटीएम सेवा पुरविणारी यंत्रणा कुचकामी असून एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. त्यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढून असे गुन्हे घडत आहेत. प्रत्येक एटीएम मशिनला सुरक्षा पुरविली तर अशा घटना घडणार नाहीत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.