खूरपण करण्यास आलेल्या शेतमजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण; 6 जणांविरुद्ध अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल

तलवाडा पोलीस ठाण्यात (Talwada Police Station) सहा जणांविरुद्ध अॅट्राॅसिटी अॅक्टनुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Farm laborer Women
Farm laborer Womenesakal
Updated on
Summary

४ हजार ८०० रुपये देऊनही तुमची एवढ्या लवकर खूरपण कशी झाली? यावरुन शेतमालक व इतरांनी शेतमजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

जातेगाव (जि. बीड) : राजेगाव (ता. माजलगाव) इथं आठ शेतमजूर महिला मारफळा (ता. गेवराई शिवारातील एका तांड्यावर कपाशी खूरपण करण्यास आल्या होत्या. ४ हजार ८०० रुपये देऊनही तुमची एवढ्या लवकर खूरपण कशी झाली? यावरुन शेतमालक व इतरांनी शेतमजूर महिलांना (Farm laborer women) जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १३) सायकांळी घडली.

यावरुन तलवाडा पोलीस ठाण्यात (Talwada Police Station) सहा जणांविरुद्ध अॅट्राॅसिटी अॅक्टनुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली. मारफळा (ता. गेवराई) येथील अनिल राठोड यांच्या कपाशीची खूरपण करण्यासाठी राजेगाव येथील भाग्यश्री उमेश साळवे व अन्य सात महिला शनिवार (ता. १३) सकाळी दहा वाजता आल्या होत्या.

Farm laborer Women
मोठी बातमी! विशाळगडावरील तब्बल 70 अतिक्रमणे जमीनदोस्त; संभाजीराजेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई

दिवसभराचे खुरपणीचे काम पूर्ण केल्यानंतर शेतमालक अनिल राठोड, गंगाधर राठोड आणि इतर तीन पुरुष आणि एक महिला तेथे आले. आम्ही तुम्हाला ४ हजार ८०० रुपये देऊनही इतक्या लवकर खूरपण कशी झाली? असे म्हणून तुम्हाला शेतमजुरीची रक्कम देणार नाही, असे म्हणत रिक्षा चालक उमेश साळवे यास गुण धरुन खाली पाडून मारहाण केली.

तसेच सर्व शेतमजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. भाग्यश्री साळवे या शेतमजूर महिलेच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अनिल राठोड, गंगाधर राठोड यांच्यासह अनोळखी तीन पुरुष व एक महिला यांच्यासह सहा जणांविरुद्ध अॅट्राॅसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com