Ravindra Keskar : धाराशिवमध्ये प्रसिद्ध लेखक कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला, घटनेने खळबळ

धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात लोकांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण करण्याची घडना आठ वाजेच्या सुमारास घडली.
Ravindra Keskar
Ravindra Keskarsakal
Updated on

धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात लोकांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण करण्याची घडना आठ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेच्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तिवृ निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रविंद्र केसकर यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली.

रवींद्र केसकर हे जिल्ह्यातील अग्रगण्य लँटनमराठी यूट्यूब चैनल व दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी आहेत ते आपले कार्यालयीन काम आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना धाराशिव येथील अमर पॅलेस ते साळुंके नगर बेंबळी रोड या भागात मारहाण केली.चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे.केसकर या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत.त्यांची दुचाकी चोरून नेण्यात आली.ही गाडी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात एका पोट्रोल पंपाजावलळ बेवारस आवस्थेतआढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या यंत्रणेला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र,हल्ल्याचा प्रयत्न का झाला,या मागचे सूत्रधार कोण आहेत,पत्रकारांना टार्गेट का केले जातेय,असे प्रश्न निर्माण होत आहेत.

Ravindra Keskar
Akola Loksabha: अकोला मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस अन् भाजपचं असणार आव्हान

या घटनेचा जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी तीवृ निषेध केला जात असून पोलिसांनी घटनेची तक्रार नोंदवून घेतली आहे.तपास जलदगतीने व्हावा,यासाठी आज मंगळवारी दुपारी चार वाजता पोलिसांना सर्वच पत्रकारांच्या वतीने निवेदन देणार असल्याचे धाराशिव पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.