Beed Crime : बीडमध्ये माजी मंत्र्यांच्या सहायकावर शस्त्राने हल्ला; कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न

माजी मंत्री सुरेश नवले यांचे स्वीय सहायक ललित अब्बड यांच्यावर शस्त्राने हल्ला झाला. वार चुकविल्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर झाल्या जखमा.
Injured Lalit Abbad
Injured Lalit Abbadsakal
Updated on

बीड - माजी मंत्री सुरेश नवले यांचे स्वीय सहायक ललित अब्बड यांच्यावर शस्त्राने हल्ला झाला. वार चुकविल्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बीड शहरातील महावीर चौकात घडला. अब्बड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री ललित अब्बड हे पेठबीड भागातील महावीर चौकातील घरासमोर उभे होते. यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. अब्बड यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अब्बड यांनी अचानक पाहिल्याने हा वार चुकवत हातावर घेतला. यात त्यांच्या दोन्ही हातांच्या मनगटावर जखम झाली आहे.

हल्ल्यानंतर अब्बड यांना आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोर कोण होते, हल्ल्याचे कारण काय हे अद्याप अस्पष्ट असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.