छत्रपती संभाजीनगर : पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात अटीतटीचा सामना आहे. एकवटलेला हिंदू मतदार, मुस्लिम मतांची फाटाफूट आणि मराठा मतांच्या निर्णायक भूमिकांवर गणित आहे..या मतदारसंघात ६०.६३ टक्के मतदान झाले. अतुल सावे गेली दहा वर्षांपासून आमदार आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेटपदी बढती मिळालेले सावे यावेळी विजयाची हॅटट्रिक करतील का, याकडे लक्ष लागले. दुसरीकडे त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी कडवी झुंज दिली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम मतांमध्ये विभागणी होण्याच्या दृष्टीने ऐनवेळी उमेदवार बदलत अफसर खान यांना उमेदवारी दिली. याशिवाय एमआयएममधून नुकतेच बाहेर पडलेले डॉ. गफ्फार कादरी यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवत एमआयएमला आव्हान दिले. काँग्रेस महाविकास आघाडीने आधी एम.के. देशमुख यांच्या रूपाने मराठा उमेदवार देत पूर्वमध्ये चुरस निर्माण केली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसने अचानक देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. रिंगणात तीन प्रमुख मुस्लिम उमेदवार आणि याशिवाय छोटे-मोठे आणखी १२ मुस्लिम अपक्ष आहेत.हेही वाचा.Chh. Sambhajinagar Election : पावणेचारशे बसअभावी प्रवासी झाले सैरभैर.त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीचे अतुल सावे यांच्यासाठी मतदारसंघातील मराठा मतदार निर्णायक भूमिकेत असणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची महायुतीविरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीनंतर कायम असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने तडकाफडकी बदल केल्याबद्दलची चर्चा अजूनही मतदारसंघामध्ये होताना दिसते. इम्तियाज यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या त्यांच्या मागणीला एमआयएमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रचारादरम्यान जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याच्या अटीनुसार शपथपत्र लिहून देत निवडून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठविण्याची हमीही इम्तियाज यांनी जाहीर सभेतून देत मराठा मतदारांना साद घातली होती..त्यांच्या आवाहनाला जरांगे पाटील आणि मराठा समाजाची साथ मिळाली का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. इम्तियाज यांना एकूण मुस्लिम मतांच्या ६० ते ७० टक्के मतदान झाल्याचा दावा केला जात आहे. तो जरी खरा मानला, तरी इम्तियाज यांच्या विजयाचे गणित बारा मुस्लिम उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीमुळे जुळून येणे कठीण दिसत आहे. त्यांना मराठा, ओबीसी मतदारांची काही प्रमाणात का होईना, साथ मिळाल्याशिवाय पूर्व मध्ये ‘पतंगा’ला हवा मिळणे अवघड आहे.दुसरीकडे सावे यांची मदार भाजपचा बेस असलेल्या ओबीसी मतदारांवर आहे. मात्र, सावे यांनाही विजयासाठी मराठा मतदान काही प्रमाणात होणे आवश्यक आहे. एकूणच पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा मतदार किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. महाविकास आघाडीचे शेवाळे यांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली? याबद्दल शंका आहे. महायुतीविरोधात राज्यभरात महाविकास आघाडी हा प्रमुख पक्ष असताना पूर्वमध्ये मात्र महाविकास आघाडीचे अस्तित्व फारसे जाणवले नाही. याउलट एमआयएम विरुद्ध महायुती अशी थेट लढत इथे झाल्याचे पाहायला मिळते.हेही वाचा.भिवंडी पश्चिममध्ये अटीतटीचा सामना.मतदानाचा टक्का उत्साहवर्धक नसला तरी पूर्वमध्ये अटीतटीचा सामना आहे. मतदान संपल्यानंतर सावे आणि इम्तियाज या दोन्ही उमेदवारांची देहबोली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे निवडणूक निकालाची अस्पष्टता दर्शविणारे होते.#electionwithsakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.