औरंगाबादच्या औद्यागिक क्षेत्राला बूस्ट; Audi Q7 कारची होणार निर्मिती

ऑडीQ7 पाच लाख इतक्या सुरूवातीच्या रक्कमेमध्ये बुक करता येणार आहे.
Audi Q7
Audi Q7
Updated on

औरंगाबाद : जगप्रसिद्ध जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने (Audi Started Q7 Booking In India) आज भारतात त्यांच्या नेक्स्ट-जनरेशन ऑडी Q7 च्या बुकिंग सुरू झाल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या कारची निर्मिती औरंगाबादच्या (Audi Aurangabad Plant) प्लांटमध्ये केली जाणार आहे. यामुळे अंजिठा वेरूळ, 52 दरवाजांचे शहर, एकेकाळी सर्वात वेगाने विकसित होणारी औद्योगिक नगरी आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादकरांच्या पारड्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्राहकांना औरंगाबाद प्लांटच्या माध्यमातून ऑडी Q7 500,000 रूपये इतक्या सुरूवातीच्या बुकिंग रक्कमेमध्ये बुक करू शकणार आहेत. (Audi Q7 Production In Aurangabad Plant)

Audi Q7
ऑडी इंडियाने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

आम्ही आजपासून या कारच्या बुकिंग्जचा शुभारंभ करत असून, ऑडी Q7 च्या माध्यमातून आम्ही नवीन डिझाइन आणि वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ऑडी Q7 ऑडी समूहामध्ये सहभागी होण्याची इच्‍छा असलेल्या विद्यमान आणि भावी ग्राहकांमध्ये ही कार नक्कीच लोकप्रिय होईल, असा विश्वास ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों (Audi India chief Balbir Singh Dhillon) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) प्लांटमध्ये ऑडी Q7 ची निर्मिती होणार असल्याने मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे.

Audi Q7
टाटा नेक्सॉन पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोणती कार ठरेल बेस्ट, समजून घ्या

ऑडी Q7 ची वैशिष्ट्ये

ऑडी Q7 मध्ये अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, पार्क असिस्ट प्लससह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग देण्यात आले आहे. मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स आणि रिअर एलईडी टेल लॅम्प्ससह पुढील आणि मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय 4-झोन एअर कंडिशनिंग, एअर आयनोझर यासह अनेक फिचर्स देखील देण्यात आली आहेत. (Features Of Audi Q7 )

ऑनलाइन करता येणार बुकिंग

नवीन ऑडी Q7 प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. ग्राहक या कारची बुकींग www.audi.in वर जाऊन देखील करू शकणार आहेत. त्याशिवाय ग्राहक भारतातील जवळच्या ऑडी डिलरकडेदेखील याची नोंदणी करू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.