औंढा : पिक्चर अभी बाकी है!

पंचायत समितीची आरक्षण सोडत झाली.
aundha
aundhasakal
Updated on

औंढा नागनाथ : पंचायत समितीची आरक्षण सोडत झाली. त्यामुळे जवळपास चित्र स्पष्ट झाले. पण, आता निवडणुकीत खरी रंगत येणार आहे. इच्छुकांची तयारी, प्रतिस्पर्धीने निवडणूक लढवू नये, यासाठी मनधरणी या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे ट्रेलर रिलीज झाला असला तर पिक्चर बाकी आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयामध्ये २० गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, निवडणूक नायब तहसीलदार सचिन जोशी, गटविकास अधिकारी सखाराम बेले होते. आरक्षण सोडत कार्यक्रमाप्रसंगी शैलेश वाईकर, नितीन हजारे, उमाकांत मुळे, नितीश कुलकर्णी, शरद नाईकनवरे, अनिल पाथरकर, ज्योती केजकर, संजय पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

भार्गवी नितीश कुलकर्णी हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये येहळेगाव सोळंके अनुसूचित जमाती (महिला), लाख, पिंपळदरीतर्फे, नांदापूर (सर्वसाधारण), येडूद (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), जलालदाभा (सर्वसाधारण), दरेगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ः महिला), माथा, दुधाळा (सर्वसाधारण ः महिला), सिद्धेश्वर (अनुसूचित जाती

महिला), भोसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), अंजनवाडी (अनुसूचित जाती ः महिला), रूपूर सर्वसाधारण, उखळी अनुसूचित जमाती, चिंचोली निळोबा, जवळा बाजार सर्वसाधारण, आजरसोंडा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), पुरजळ, शिरडशहापूर सर्वसाधारण (महिला), आसोला (अनुसूचित जाती), सेंदुरसना (अनुसूचित जमाती (महिला) असे गणनीहाय आरक्षण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.