औंढा नागनाथ : तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यापैकी तांमटी तांडा, काठोडा तांडा येथील निवडणूक बिनविरोध झाली तर चार ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यांचा निकाल मंगळवारी (ता. १९) जाहीर झाला. यात सहा गावांच्या सरपंचपदावर महिलांची वर्णी लागली.
रविवारी निवडणूक झालेल्या चिंचोली निळोबा, पिंपळा, लक्ष्मणनाईक तांडा, संघनाईकतांडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या दोन आणि निवडणूक झालेल्या चार अशा चार ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज आले आहे. यामध्ये बिनविरोध झालेल्या तामटी तांडा येथील सरपंचपदी शिवकन्या जाधव, काठोडा तांड्याच्या सरपंचपदी रंजना राठोड यांची निवड झाली. निवडणूक झालेल्या गावांपैकी पिंपळा येथील सरपंचपदी अनसूया पोले, चिंचोली निळोबापदी सरपंचपदी संपदा गरड, संघनाईक तांड्याच्या सरपंचपदी उषा जाधव आणि लक्ष्मण नाईक तांड्याच्या सरपंचपदी ज्योती पवार निवडणूक आल्या.
निवडणूक तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार सचिन जोशी, अव्वल कारकून शैलेश वाईकर यांनी निवडणुकीचे नियोजन केले. निवडणुकीसाठी आनंद पुरी, गंगाधर गिनगिने, गणेश पाटील, हनीफ खाँ पठाण, राजू सवनेकर यांनी काम केले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी तहसील परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
चिंचोली निळोबा ः सरपंच संपदा गरड. सदस्य इंदुमती पारटकर, रामा वैद्य, प्रकाश वैद्य, कांताबाई भिसे, नीलावंती वैद्य, बाबाराव जाधव, उषा मोरे, रामा देवकर, नीलावंती मोरे.
संघनाईक तांडा ः सरपंच उषा जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव जाधव, यशोदा पवार, विमल पवार, परसराम जाधव, कांताबाई राठोड, रुस्तुम राठोड, विजूबाई पवार.
लक्ष्मणनाईक तांडा ः सरपंच ज्योती रवींद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य गयाबाई राठोड, बेबी राठोड, नारायण राठोड, शंकर जाधव, पारूबाई राठोड, सीमा पवार, शांताबाई पवार.
पिंपळा ः सरपंच अनसूया पोले, ग्रामपंचायत सदस्य संजय पोले, वंदना पोले, भगीरथी पोले, रंगनाथ कऱ्हाळे, सविता कऱ्हाळे, अनसूया जाधव, आशिष पोले.
काठोडातांडा ः सरपंच रंजना राठोड, सदस्य बाबाराव जाधव, सुमनबाई राठोड, जनाबाई पवार, लक्ष्मीबाई राठोड, लिंबाजी चव्हाण, सुमन चव्हाण, बाबूलाल चव्हाण.
तामटी तांडा ः सरपंच शिवकन्या जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, पूजा राठोड, शेषेकला राठोड, बापूराव जाधव, कमल जाधव, सुरेखा जाधव, अनिल राठोड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.