औरंगाबाद : पुनर्वसित ११ गावांची होणार नगरपंचायत

जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींचे मागविले ठराव
Aurangabad 11 gram panchayat will be Nagar Panchayat
Aurangabad 11 gram panchayat will be Nagar Panchayatsakal
Updated on

माजलगाव : शहराला खेटूनच असलेल्या ११ पुनर्वसित गावांची मिळून एकच नगरपंचायत करण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरविकास मंत्र्याकडे केली आहे. याची दखल घेत नगर विकासासह जिल्हा प्रशासने हालचाली सुरु केल्या आहेत. नगरपंचायतीत सहभागी होण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून ग्रामसभांसह इतर ठराव पंचायत समितीने मागविले आहे. तर नगरपंचायतीत सहभागानंतर फायद्या-तोट्याचे गणित जुळत नसल्याने नागरिकात संभ्रम दिसून येत आहे.

माजलगाव शहराच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने शहराचा भौगोलिक विस्तारही दिवसेंदिवस वाढत आहे. माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्या ११ खेड्यांचे पुनर्वसन माजलगाव शहराला खेटूनच झालेले आहे. सद्यःस्थितीत शहर आणि पुनर्वसित खडे वेगवेगळे असल्याचे नवीन माणसांना अजिबात वाटत नाही. दोन गावे सोडली तर, आठ खेड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा प्राप्त असून प्रत्येक गाव आपापला स्वतंत्र कारभार हाकत आहेत. जो काही हक्काचा निधी येतो त्यातूनच गावाच्या विकासाची कामे ग्रामपंचायत स्तरावर सध्या होत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार यातील यातील तीन गावांची लोकसंख्या तीन हजाराच्यावर असून दोन गावांची लोकसंख्या ही हजाराच्यावर आहे.

तीन महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांनी ११ पुनर्वसित गावांची एकच नगरपंचायत करण्याबाबत संबंधित गावातील नागरिकांची बैठक घेतली होती. यावेळी अनेक गावातील नागरिकांनी याला विरोधही केला होता; परंतु १४ मार्च २०२२ ला आमदार सोळंकेंनी नगरविकास मंत्र्यांना पत्र पाठवून नगरपंचायत स्थापनेची मागणी केली.

  • गावाची नावे लोकसंख्या

  • केसापुरी ४४३१

  • भाटवडगाव ३६४२

  • चिंचगव्हाण ३२४८

  • ब्राम्हगाव १०८३

  • शेलापुरी ११३३

  • खानापूर ८६६

  • देवखेडा ८९८

  • पुनंदगाव ६५९

  • रेणापुरी ५०६

  • नागझरी ००७

  • नांदूर ११८

  • एकूण लोकसंख्या १० हजार ५०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.