Aurangabad : तरुणाचा पुरलेला मृतदेह पुन्हा उकरला,वडिलांनी व्यक्त केला खुनाचा संशय

जालना जिल्ह्यातील नातेवाइकाच्या घरी गेलेल्या तरुणाचा तिकडेच मृत्यू झाला.
Death
Deathesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर ः जालना जिल्ह्यातील नातेवाइकाच्या घरी गेलेल्या तरुणाचा तिकडेच मृत्यू झाला. दरम्यान, तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईक महिलेने तरुणाच्या वडिलांना दिली. दरम्यान, त्याचा मृतदेह रातोरात शहरात आणण्यात आला. नंतर दफनविधीही केला. मात्र, वडिलांनी संशय व्यक्त केला. त्यांनी मुलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने आता घनसावंगी पोलिसांनी शहरातील कब्रस्तान गाठत पाच दिवसांनी पुरलेला मृतदेह उकरून काढत तपासाला सुरुवात केली आहे.

Death
Eye Care Tips : डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

शहरातील जिन्सी परिसरातील गंजेशहिदा कब्रस्तानात ही प्रक्रिया शहर पोलिस दलाच्या मदतीने गुरुवारी (ता.२३) दिवसभर सुरू होती. साफेद (सालेह) फरहान हिलाबी (वय १९, रा. नारेगाव) असे मृताचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. साफेदचे वडील शहर परिसरात राहत असून मजुरी करतात. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. तो कुटुंबीयासह राहत होता. १२ नोव्हेंबरला घनसावंगी (जि. जालना) येथील आत्याच्या घरी गेला होता. तो तिकडे असताना त्याने आत्महत्या केल्याची माहिती आत्याने मृत तरुणाच्या वडिलांना फोनवर सांगितली.

Death
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

मात्र, या प्रकरणाची माहिती आत्याने पोलिसांना कळविली नाही; तसेच या घटनेची खबर स्थानिक पोलिसांनाही लागली नाही. त्यानंतर रातोरात तरुणाचा मृतदेह शहरातील त्याच्या कौसर पार्क, नारेगाव परिसरातील घरी आणण्यात आला. त्यानंतर सर्व नातेवाईक जमा झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत १८ नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्याच्या रस्त्यावर असलेल्या गंजेशहिदा कब्रस्तानात त्याचा रीतसर दफनविधी करण्यात आला होता. मात्र, आपल्या मुलाच्या मुलाच्या मृत्यूवर संशय व्यक्त करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज वडिलांनी पोलिसांकडे केला.

त्यानंतर घनसावंगी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक डोलारे आणि उपनिरीक्षक मधुकर पाटील यांनी पथकासह जिन्सी परिसरात धाव घेतली. जिन्सी ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांच्यासह कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिला. त्यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह उकरून वर काढला. दरम्यान, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. मृतदेह उकरून शवविच्छेदनासाठी घाटीत नेण्यात आला. या प्रकरणी जिन्सी ठाण्याच्या स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.