औरंगाबाद- दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातून मोफत जयपुर फूट (कृत्रीम पाय), कॅलिपर्स, ट्रायसिकल तर अंधांना पांढरी काठी, गॉगल, कर्णबधिकांना श्रवणयंत्र दिले जाते. मात्र या केंद्रात तज्ञ आणि पुरेशा मनुष्यबळाची वानवा आहे. या केंद्राला पुरेसा निधी मिळाला तर केवळ औरंगाबादच नव्हे तर मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यातील दिव्यांगांची गैरसोय टळणार आहे.
दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी पूर्वी दिव्यांगाना जयपूर फुटसाठी थेट जयपूरलाच जावे लागायचे किंवा कधीतरी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिराच्या आयोजनाकडे डोळे लावून बसावे लागायचे. 2000 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मंजूर झाले आणि ते पुढील तीन वर्ष ऍलिम्को नावाच्या केंद्राच्या कंपनीने चालवले. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूटने चालवले आणि 2006 मध्ये रेडक्रॉसकडे दिले.
पण ते बंद पडल्यातच जमा होते, कारण या केंद्रासाठी असा स्वतंत्र कोणताही निधी उपलब्ध करुन दिला गेला नव्हता. दरम्यानच्या काळात समर्थनगर येथील गांधी भवनात मराठवाड्यातील लोकांना महात्मा गांधी सेवा संघामार्फत कृत्रीम साहित्य मिळण्यासाठी केंद्र सुरु केले होते. त्याचवेळी मराठवाड्यासाठी सुरु केलेल्या या केंद्रातुन लगतच्या जळगाव आणि नगर जिल्ह्यातूनही दिव्यांग येत होते.
वीस हजार रुग्णांनी घेतला लाभ
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक विजय कान्हेकर म्हणाले, की जिल्हा दिव्यांग केंद्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र घाटी रुग्णालयात दोन खोल्यांमध्ये चालवले जायचे. 2008 मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल आमच्या महात्मा गांधी सेवा संघाकडे विचारणा केली की, हे सीक युनिट तुम्ही चालवाल का, तसेच याला कोणताही निधी मिळत नाही असेही स्पष्ट केले.
त्यानंतरत्यांनी आमचे हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे ते आजारी असून तुम्ही चालता का असे विचारले. मात्र याला कोणताही निधी मिळत नाही हेही त्यांनी सांगीतले. त्यावेळी घाटी रुग्णालयात दोन खोल्या होत्या. तिथे त्यावेळी एकच कर्मचारी होता, त्या कर्मचाऱ्याला सोबत घेउन आणि समर्थनगरातील गांधी भवनमधील केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन हे केंद्र चालवले. निधीची गांधी सेवा संघाकडूनच टेक्नीशयन ठेवले, ओपीडी सुरु केली असून 2008 पासून 15 ते 20 हजार रुग्णांना मोफत साहित्य दिले आहे.
जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम?
घाटीने जागा परत घेतल्याने गैरसोय
घाटीमध्ये दोन खोल्या होत्या मात्र त्या घाटी प्रशासनाने आम्हाला जागेची गरज असल्याचे सांगीतल्याने जिल्हा पुनर्वसन केंद्राची जागा मागितली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनशी चर्चा करुन त्यांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जागा उपलब्ध करुन देण्याविषयी सांगीतले आणि गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत झाले आहे. घाटी प्रशासनाने जागा घेतल्याने रुग्णांची मात्र गैरसोय होत आहे. कारण घाटीत जाणाऱ्या रुग्णांना थेरपीसाठी चिकलठाण्यात जावे लागत आहे.
सेवा मोफत मात्र तज्ज्ञ मनुष्यबळासाठी गरज निधीची
मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या प्रयत्नातुन गेल्यावर्षीपासून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शीघ्र निदान व शीघ्र उपचार सेंटर विकसीत केले आहे. तिथे ओएई, बेरा, ऑडिओमेट्री या कर्णबधीरासाठीच्या हायटेक तपासण्या व स्पिच थेरपी, ऑकुपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी दिली जाते. महिनाभरात यासाठीचे इक्विपमेंट बसवलेत. यासाठी महात्मा गांधी सेवा संघातर्फे टेक्नीशियन उपलब्ध करुन दिले आहेत, मात्र रुग्णसंख्या वाढली तर सध्याचे तज्ञांचे मनुष्यबळ पुरेसे नाही. तर मनुष्यबळासाठी कोणताही निधी मिळत नाही यामुळे निधी मिळणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रयत्न सुरु असल्याचे श्री. कान्हेकर यांनी सांगीतले.
अरे बापरे - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता
इथे मिळते सर्व मोफत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.