Aurangabad : परीक्षेसाठी आली माऊली,महापालिकेत शिक्षकांच्या २३ जागांसाठी तीनशे उमेदवार

महानगरपालिकेने पाच सीबीएसई शाळांसाठी २३ कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे
Aurangabad news
Aurangabad newsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने पाच सीबीएसई शाळांसाठी २३ कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शुक्रवारी (ता. २४) स्मार्ट सिटी कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी तब्बल ३०० उमेदवार आले होते. कंत्राटी का होईना, पण नोकरीच्या आशेने तान्हुल्याला घेऊन एका माऊलीनेसुद्धा ही परीक्षा दिली.

Aurangabad news
Mens Health Tips : फिट्ट अंडरवेअर वापरणं जीवावर बेतू शकतं, अशी करा योग्य अंडरवेअरची निवड

सीबीएसई शाळांसाठी २३ शिक्षक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला होता. त्यानुसार महापालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या महाराणा सेक्युरिटी एजन्सीला २३ शिक्षक पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. एजन्सीने २३ शिक्षकांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. खासगी एजन्सीमार्फत शिक्षक घेतले जात असले तरी शिक्षकांची निवड महापालिका अधिकारी करत आहेत.

Aurangabad news
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

कंत्राटी शिक्षकांसाठी सुमारे ३०० जणांनी अर्ज केले होते. या सर्वांच्या शुक्रवारी (ता. २४) स्मार्ट सिटी कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, शिक्षण विभागप्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, नाथ व्हॅली शाळेचे मुख्याध्यापक सरबजितसिंग दासगुप्ता यांच्या पॅनेलने मुलाखती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘त्या’ शिक्षकांना परत पाठवणार

महापालिकेने शहरात पाच सीबीएसई शाळा सुरू केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे पाचही शाळा फुल्ल झाल्या. आजमितीला ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सुरवातीला महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना सीबीएसई शाळेत शिकविण्याची संधी देण्यात आली. ज्या शिक्षकांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, अशा निवडक २३ शिक्षकांना सीबीएसई शाळेसाठी वर्ग करण्यात आले. पण यामुळे मराठी व उर्दू शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने हे शिक्षक पुन्हा त्यांच्या मुळ जागेवर परत पाठविले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.