Aurangabad : अबला नव्हे; मुली होणार सबला!

जिल्हा परिषदेच्या ८९० शाळांत स्वसंरक्षणाचे धडे
Aurangabad
Aurangabadesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुलगी म्हटले नाजूक. काही झाले की मुसमुसू रडणारी. एकटी घराबाहेर जाण्यास घाबरणारी, असेच म्हटले जाते. समाजानेही तिच्यावर हेच संस्कार केले. अजूनही अनेक घराघरांतील चित्र बदलेले नाही. त्यामुळेच मोठ्या मुलीला कुठे जायचे असेल तर बऱ्याचवेळा लहान भाऊ ‘बॉडीगार्ड’ म्हणून सोबत असतो. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने पुढाकार घेतला. मुलीला अबला नव्हे सबला करण्यासाठी जिल्ह्यातील ८९० जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना आत्मरक्षा प्रशिक्षणाअंतर्गत कराटे, बॉक्सिंगचे धडे दिले जात आहेत. यासाठी राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी पुढाकार घेतला.

Aurangabad
Beauty Tips : चेहरा गोरापान अन् काळी कुळकुळीत मान, हे घरगुती उपाय करा,नक्की फरक पडेल

मुलीवरील अत्याचार कमी करण्यासाठी मुलींनी सक्षम होणे गरजेचे आहे. हे ओळखून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील २२ हजार शाळांमध्ये सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत स्वसंरक्षणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. अगदी लहान वयापासून या मुलींना अशा पद्धतीने प्रशिक्षण दिले तर या मुली कोणत्याही मोठ्या संकटाला सामोऱ्या जाऊ शकतील. या उपक्रमामुळे मुलींची भावी पिढी ही सक्षम होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ८९० शाळेमधील मुलींना प्रशिक्षण दिले जात आहे.

कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना संयम कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास विकसित करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८९० शाळांमधील मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे.

— जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.