Career Opportunity : ‘सकाळ’ देणार करिअरची १०० जणांना संधी!

‘सकाळ’मध्ये तब्बल १०० जणांना उज्ज्वल करिअर घडविण्याची संधी दिली जाणार आहे. यात ‘वॉक इन इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून निवड केली जाईल.
Job Interview
Job Interviewsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘सकाळ’मध्ये तब्बल १०० जणांना उज्ज्वल करिअर घडविण्याची संधी दिली जाणार आहे. यात ‘वॉक इन इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून निवड केली जाईल. यासाठी प्रत्यक्ष अर्ज करण्याचे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाने केले आहे.

विश्वासार्हतेचा ब्रॅंड म्हणून ‘सकाळ’ कायमच ओळखला जातो. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘सकाळ’चे नवे रूप वाचकांना भावलेले आहे. अशा माध्यम समूहात विशेष उपक्रमाअंतर्गत भविष्य उज्ज्वल करण्याची संधी आता मिळणार आहे. यासाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला-पुरुष अशा दोघांनाही वयाची अट किमान १८ ते कमाल ४५ वर्षे अशी आहे.

जनसंपर्काची आवड, वाचन-लेखनाची आवड, आजूबाजूच्या घडामोडींचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ता. ४ जुलै ते ६ जुलैपर्यंत अर्जासह मुलाखतीला यावे. यानिमित्ताने रोजगारासोबतच माध्यम क्षेत्रातील कामाचा अनुभव, विविध कौशल्ये उमेदवार शिकू शकतात. तसेच निवड झालेले उमेदवार महिन्याला किमान २५ हजार रुपये मानधन मिळवू शकतील. यासाठी सकाळ कार्यालयात प्रत्यक्ष येऊन अर्ज करण्याचे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्जासह प्रत्यक्ष भेटा

‘सकाळ’ कार्यालय, टाऊन सेंटर, अक्षयदीप प्लाझाशेजारी, सिडको बसस्थानकाजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर.

आजपासून ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ : वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.