छत्रपती संभाजीनगर परिमंडळात सर्व वर्गवारीतील १३ लाख ४२ हजार ४०४ पैकी १२ लाख ९१ हजार ४६६ अर्थात ९६.२१ टक्के ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल पाठवण्यात येत आहे. या सगळ्यांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवलेला आहे.
महावितरणकडे मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीजबिल तयार होताच ऑनलाइन पाठविण्यात येते. महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाइल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेतील एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते.