Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकरवर १४७ कोटींचा खर्च; ‘जलजीवन मिशन’ योजनेचं काय

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जवळपास ६७७ कोटी रुपयांच्या योजना मंजूर केल्या. त्यांची कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते.
147 crore spent on tankers in Chhatrapati Sambhajinagar What about the Jaljeevan Mission scheme
147 crore spent on tankers in Chhatrapati Sambhajinagar What about the Jaljeevan Mission schemeSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जवळपास ६७७ कोटी रुपयांच्या योजना मंजूर केल्या. त्यांची कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते.

मात्र, यातील बहुतांश योजना वेळेवर पूर्ण केल्या नाहीत; तसेच गतवर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील लाखो नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. यात १४७ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. एकीकडे या विभागांच्या पाणी योजनांचे जलस्रोत कोरडे पडल्यामुळे तेथेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

केंद्र सरकारने ‘प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा’ हे घोषवाक्य घेऊन जलजीवन मिशन ही योजना तयार केली आहे. त्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे, तर एकट्या गावासाठी पाणीपुरवठा योजना उभारण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ६७७ कोटींच्या ११६१ योजना मंजूर केल्या. त्यातील ५५६ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या आहेत. दरम्यान, जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनांची कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र, या मुदतीत सर्व योजना पूर्ण झालेल्या नाहीत.

त्यातच मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने पर्जन्यछायेच्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यात टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहीर अधिग्रहण व टँकर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील जुलैपासून आतापर्यंत या टँकर व विहीर अधिग्रहणासाठी १४७ कोटी रुपये खर्च झाला आहेत.

५५४ खासगी टँकरचा वापर

जिल्ह्यातील ३६१ गावे व ६४ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी सरकारी शून्य व ५५४ खासगी टँकरचा वापर केला आहे. या पाणीपुरवठ्यासाठी टँकरच्या ९६९ फेऱ्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय टँकर

  • छ.संभाजीनगर - ९४

  • पैठण - ९१

  • सिल्लोड - ६५

  • वैजापूर - ११६

  • गंगापूर -१४६

  • फुलंब्री - ०४

  • खुलताबाद -०२

  • सोयगाव - ०२

  • कन्नड - ३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.