छत्रपती संभाजीनगर : सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम खाद्य तेलाच्या किमतीवर झाला. सरकारने ही घोषणा करतात खाद्य तेलाच्या किमती किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढले आहेत. त्यामुळे आता स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला.